Pakistan vs Bangladesh 2nd Test : रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात एका क्षणी पाकिस्तानने आपली पकड चांगलीच मजबूत केली होती. त्याने अवघ्या 26 धावांत बांगलादेशच्या 6 खेळाडूंना आऊट केले होते. 


बांगलादेशचा संघ 50 धावाही करू शकणार नाही आणि त्याआधीच कोलमडून पडेल असे वाटत होते. मात्र, बांगलादेशसाठी संकटमोचक ठरला 'लिटन दास'. त्याने शानदार शतक झळकावून पाकिस्तानला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले.


खरंतर, पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी करताना केवळ 274 धावा करू शकला. या धावा खूप कमी आहेत आणि बांगलादेश संघ आघाडी घेईल असे वाटत होते पण तसे झाले नाही. पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या बांगलादेश संघाची शीर्ष फळी पूर्णपणे फ्लॉप ठरली आणि 26 धावांत केवळ 6 विकेट पडल्या. 






गेल्या सामन्यात जबरदस्त शतक झळकावणाऱ्या मुशफिकुर रहीमला या सामन्यात केवळ 3 धावा करता आल्या. मात्र, खालच्या फळीत लिटन दास आणि मेहदी हसन मिराझ यांनी डावाची धुरा सांभाळली. या दोन फलंदाजांनी सातव्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली.


यादरम्यान मेहदी हसन मिराजने 124 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 78 धावा केल्या. तर लिटन दासने शानदार शतक झळकावले. त्याने दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले. 


लिटन दासच्या शतकामुळेच पाकिस्तानच्या आशा पल्लवित झाल्या आहे. पाकिस्तान संघ मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न करत होता पण लिटन दासने हे होऊ दिले नाही. लिटन दासने 228 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 138 धावांची जबरदस्त खेळी केली.






26 धावांवर 6 विकेटवरून लिटन दास आणि मेहदी हसन मिराजने बांगलादेश संघाला 262 पर्यंत नेले. पाकिस्तानला फक्त 12 धावांची आघाडी मिळली. आता पाकिस्तान संघाचा दुसरा डाव सुरू झाला आहे. पाकिस्तानचा संघ पहिला सामना हरला आहे. या कारणास्तव त्यांना हा दुसरा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे.


हे ही वाचा -


Danielle Wyatt wedding Photo : आधी विराट कोहलीला केलं होतं प्रपोज, आता चक्क मुलीसोबत लग्न; महिला क्रिकेटरचे फोटो चर्चेत


Pak vs Ban Test : नाही सुधारणार पाकिस्तान, 3 खेळाडूंना मिळून पकडता आला नाही सोपा कॅच, Video होतोय तुफान व्हायरल


Champions Trophy 2025 : पाकिस्तानचं काय होणार, आता PM मोदी ठरवणार; दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ