Danielle Wyatt wedding Photo : आधी विराट कोहलीला केलं होतं प्रपोज, आता चक्क मुलीसोबत लग्न; महिला क्रिकेटरचे फोटो चर्चेत
टीम इंडियाची रनमशीन म्हटला जाणारा विराट कोहली एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. विराट कोहलीच्या फॅन फॉलोइंगबद्दल सर्वांनाच माहिती आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनियल वॅट हिने विराटला लग्नासाठी प्रपोज केले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनियल वॅटने अलीकडेच त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया हॉजसोबत लग्न केले आणि तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. डॅनियल वॅट आणि जॉर्जिया हॉज 2019 पासून एकमेकांना डेट करत होत्या.
2014 मध्ये टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर असताना इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनियल वॅट प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यावेळी तिने सोशल मीडियावर विराट कोहलीला लग्नासाठी प्रपोज केले होते.
इंग्लंडच्या महिला क्रिकेटरची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाली. नंतर तिने या पोस्टबद्दल सांगितले की हा फक्त एक विनोद होता.
डॅनियल वॅटची जोडीदार जॉर्जिया ही माजी फुटबॉलपटू आहे आणि फुटबॉल संघाची व्यवस्थापकही आहे. जॉर्जिया लंडनमध्ये फुटबॉल टॅलेंट एजंट म्हणून काम करते. ती सध्या CAA बेस येथे महिला फुटबॉलची प्रमुख आहे, ही एजन्सी फुटबॉलपटूंच्या करिअर विकासासाठी समर्पित आहे.
डॅनियल वॅट अलीकडेच पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिका आणि तीन एकदिवसीय मालिकेत इंग्लंड संघाचा भाग होती. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तिने 48 चेंडूत 87 धावांची आक्रमक खेळी खेळली आणि आपल्या संघाला 34 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.