MS Dhoni on his relationship with Virat Kohli : भारतीय क्रिकेटमधील दोन महान खेळाडू एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्यातील संबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. या दोघांमधील मैत्रीपूर्ण संबंध केवळ मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही स्पष्टपणे दिसून येतात. धोनी आणि कोहली भारतीय संघासाठी दीर्घकाळ एकत्र खेळले आणि एकमेकांच्या नेतृत्वाखाली त्यांची छाप सोडली.  दरम्यान एमएस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनीने विराट कोहलीसोबतच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे.


धोनी आणि कोहली 2008 ते 2009 पासून एकत्र खेळत आहे. तेव्हा धोनीने भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद स्वीकारले तेव्हा कोहली एक उगवता स्टार म्हणून उदयास आला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना कोहलीने आपल्या खेळात सुधारणा केली आणि लवकरच जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये आपले स्थान निर्माण केले. 


धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 एकदिवसीय वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, ज्यामध्ये कोहलीने महत्त्वपूर्ण योगदान दिले. यानंतर 2014 मध्ये धोनीने कसोटी संघाचे कर्णधारपद कोहलीकडे सोपवले आणि 2017 मध्ये सर्व फॉरमॅटची जबाबदारीही त्याच्या खांद्यावर आली.


धोनी आणि कोहली नेहमीच एकमेकांच्या कामगिरीचे जाहीरपणे कौतुक केले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनीला विराट कोहलीसोबतच्या नात्याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला की, दोघांमध्ये वयाचा फरक आहे पण आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे मला माहित नाही की मी त्याला मोठा भाऊ किंवा सहकारी किंवा तुम्ही काहीही नाव द्याल. पण शेवटी आम्ही सहकारी आहोत.






दुसरीकडे, कोहलीही अनेक प्रसंगी धोनीला आपला गुरू मानतो आणि धोनीच्या मार्गदर्शनाखाली खूप काही शिकल्याचे सांगतो. धोनीच्या निवृत्तीनंतरही कोहली त्याच्याकडून सल्ले घेत आहे आणि धोनीचा पाठिंबा नेहमीच त्याच्या पाठीशी राहिला आहे.


कोहली या मालिकेत खेळताना दिसणार का?


धोनी आणि कोहलीने भारतीय क्रिकेटला अनेक संस्मरणीय क्षण दिले आहेत. त्यांची भागीदारी, विशेषत: पाठलाग करताना, भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी नेहमीच संस्मरणीय राहील. अलीकडेच, कोहलीने भारताला टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यानंतर त्याने टी-20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतली. आता कोहली पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेत दिसू शकतो.


हे ही वाचा -


Pak vs Ban Test : नाही सुधारणार पाकिस्तान, 3 खेळाडूंना मिळून पकडता आला नाही सोपा कॅच, Video होतोय तुफान व्हायरल


Samit Dravid : स्वप्न भंगणार.... राहुल द्रविडचा पोरगा खेळू शकणार नाही अंडर-19 वर्ल्ड कप? जाणून घ्या कारण