ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात जाणार की नाही? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यात संपूर्ण क्रिकेट जगताला उत्सुकता आहे. कारण आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून जय शाह यांची नियुक्ती झाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतची सर्व समीकरणे बदललेली दिसत आहेत. आता यादरम्यान पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू बासित अली याने चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल भारताच्या पंतप्रधानांचे नाव घेत मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.


पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. आता तो चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, चॅम्पियन्स ट्रॉफीचा निर्णय आता पूर्णपणे पंतप्रधान मोदींच्या हातात आहे, जर ते सहमत असतील तर टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करू शकते. तसे झाले नाही तर जय शाह यांना निर्णय घेणे कठीण होईल. म्हणजेच बासित अलीच्या म्हण्यानुसार आता भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही हे पीएम मोदी ठरवणार.


बीसीसीआयने निवेदन दिले आहे का?


टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. काही अहवालांवर विश्वास ठेवला तर, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार नाही. हायब्रीड मॉडेलवर बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे, ज्या अंतर्गत भारताचे सामने पाकिस्तान ऐवजी दुसऱ्या देशात होऊ शकतात. पण पीसीबीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ही स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात आयोजित केली जाईल.


बासित अली यांनी पाकिस्तानला दिला इशारा


पाकिस्तानात खेळायला येणाऱ्या संघांच्या सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घ्यावी, असे बासित अलीने अलीकडेच पीसीबीला बजावले आहे. याचे कारण म्हणजे सुरक्षेतील अगदी कमीपणामुळे देशाला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद गमवावे लागू शकते.


आशिया कप 2023 चे आयोजनही पाकिस्तानने केले होते, त्यावेळीही भारताने पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला होता. ज्यानंतर आशिया कप 2023 हायब्रीड मॉडेलवर खेळला गेला. टीम इंडियाने श्रीलंकेत आपले सर्व सामने खेळले. 2013 पासून दोन्ही संघांमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. पण एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 दरम्यान पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता.


हे ही वाचा -


MS धोनीचे विराटसोबत कसे आहेत नातेसंबंध? खुद्द थालानेच केला मोठा खुलासा, पाहा Video


Pak vs Ban Test : नाही सुधारणार पाकिस्तान, 3 खेळाडूंना मिळून पकडता आला नाही सोपा कॅच, Video होतोय तुफान व्हायरल