Pakistan vs Bangladesh 2nd Test : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघ या मालिकेत पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. पाकिस्तानला कोणत्याही किंमतीत दुसरा कसोटी सामना जिंकायचा आहे, कारण जर पाकिस्तान हा सामना हरला तर बांगलादेश संघाकडून कसोटी क्रिकेट मालिका गमावण्याची इतिहासात पहिलीच वेळ असेल. सध्या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. करो या मरो सामन्यातही पाकिस्तानची क्षेत्ररक्षण खालच्या पातळीवर पाहायला मिळते.


तीन खेळाडूंनी सोडला एक झेल 


या मालिकेत पाकिस्तानी खेळाडूंकडून खराब क्षेत्ररक्षण पाहिला मिळाले. जिथे बाबर आझमने पहिल्या कसोटी सामन्यात एक सोपा झेल सोडला. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाकिस्तानने बांगलादेशच्या पहिल्या डावात एक सोपा झेल सोडला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एक-दोन नव्हे तर तीन पाकिस्तानी खेळाडूंनी हा झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणालाही यश आले नाही. जेव्हा हा झेल सुटला तेव्हा पंचांनाही आश्चर्य वाटले आणि त्यानेही आश्चर्यचकितपणे प्रतिक्रिया दिली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जिथे लोक पाकिस्तानच्या या क्षेत्ररक्षणाची मजा घेत आहेत.






पाकिस्तानने पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावून 274 धावा केल्या. यानंतर बांगलादेशने डावाला सुरुवात केली. डावखुरा वेगवान गोलंदाज मीर हमजाने पाकिस्तानकडून पहिले षटक करण्यासाठी आला. या षटकात त्याने स्लिपमध्ये 5 खेळाडू लावले होते. बांगलादेशचा सलामीवीर शदमान इस्लामने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर चूक केली आणि चेंडू बॅटच्या कडेला लागून स्लिपमध्ये गेला. तिथे असलेल्या सौद शकीलने तो सोपा झेल सोडला, त्यानंतर इतर दोन खेळाडूंनीही तो पकडण्याचा प्रयत्न केला. पण दोघेही यशस्वी होऊ शकले नाहीत. आता पाकिस्तानी चाहते संघाच्या खराब क्षेत्ररक्षणावर टीका करत आहेत.


सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्व विकेट्स गमावून 274 धावा केल्या. श्याम अयुब, शान मसूद आणि आगा सलमान यांनी अर्धशतकी खेळी खेळली. तर बांगलादेशचा गोलंदाज मेहंदी हसन मिराजने 5 बळी घेतले. बांगलादेश संघाची सुरुवात चांगली झाली नाही. आतापर्यंत 26 षटकांत 75 धावांत 6 विकेट्स गमावल्या आहेत. बॉलवर चमकदार कामगिरी केल्यानंतर मेहंदी हसन मिराज आता बॅटमध्येही चांगली कामगिरी करत आहे. 33 धावा करून तो क्रीजवर उभा आहे. पाकिस्तानकडून खुर्रम शहजादने 4 विकेट घेतल्या.