'आधी सचिनसाठी जितका उत्सुक होतो, तितकाच उत्साह उमरान मलिकसाठी' गावस्करांचं मोठं वक्तव्य
India Vs South africa : उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवडण्यात आलं असलं तरी अद्याप एकाही सामन्यात अंतिम 11 मध्ये स्थान मिळालेलं नाही.
Umran Malik : यंदाच्या आय़पीएल 2022 मधील कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) संघ निवड केली आहे. यावेळी युवा गोलंदाज उमरान मलिकला संघात स्थान दिलं गेलं आहे. पण या मलिकला अद्यापपर्यंत संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याला खेळताना पाहण्यासाठी सगळेच उत्साहीत असून भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीतर थेट महान फलंदाज सचिन तेंडुलकरशी त्याची तुलना करत, 'तेंडुलकरनंतर पहिल्यांदाच कोणत्यातरी खेळाडूला खेळताना पाहण्यासाठी मी उत्साहीत आहे,' असं ते म्हणाले आहेत.
सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,''मी याआधी शेवटचा सर्वाधिक उत्साहीत कोणत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी होतो, तर तो सचिन तेंडुलकर होता. मी उमरान मलिकसाठीही तसाच उत्साहीत आहे. माझ्या मते त्याला खेळण्याची संधी द्यायला हवी.''
उमरानची आयपीएल 2022 मधील कामगिरी
आयपीएल 2022 मध्ये उमरानने त्याच्या तुफान वेगाने सर्वांनाच आश्चर्यचकीत करुन सोडलं. त्याने गुजरातविरुद्ध एका सामन्यात तब्बल 5 गडी बाद करत विशेष कामगिरी केली. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच सामना गमावलेल्या हैदराबाद संघाच्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला. यावेळी उमरानने 4 ओव्हर गोलंदाजी करत केवळ 25 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. हंगामातील 14 सामन्यात उमरानने 21 विकेट्स घेत पर्पल कॅपच्या शर्यतीतही चांगली कामगिरी केली. याशिवाय आयपीएल 2022 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम गुजरात टायटन्सचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या नावावर होता. त्यानं चेन्नईविरुद्ध सामन्यात 153.9 किमी प्रतितासानं चेंडू टाकला होता. परंतु, त्यानंतर उमरान मलिकनं 154 किमी प्रतितास वेगानं चेंडू टाकत हा रेकॉर्ड तोडला. त्यानंतर 5 मे रोजी दिल्लीविरुद्ध तब्बल 157 किमी प्रतितासानं चेंडू टाकत उमराननं स्वत:चाच रेकॉर्ड तोडला. दुसरीकडे संघात पहिल्यांदाच स्थान मिळालेल्या अर्शदीपने यंदा 14 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत.
हे देखील वाचा-