KKR vs SRH : इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स आणि केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद सुपर संडेच्या दुसऱ्या सामन्यात आमनेसामने येतील. दुबईमध्ये संध्याकाळी 7.30 पासून हा सामना खेळला जाईल. केकेआरसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. कारण प्ले ऑफ रेसमध्ये टिकून राहायचं असेल तर कोलकाताला हा सामना जिंकावाच लागणार आहे. आजच्या सामन्यातील पराभवनंतर केकेआरच्या प्लेऑफसाठी पात्र होण्याची सर्व शक्यता संपुष्टात येतील. त्याचबरोबर आधीच प्लेऑफमधून बाहेर गेलेला हैदराबाद संघ आता केकेआरचा खेळ खराब करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.


कोलकाता आणि हैदराबाद सामनेसामने प्रदर्शन


कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हेड टू हेडमध्ये इयोन मॉर्गनच्या संघाचा दबदबा आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 20 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान केकेआरने 13 सामने जिंकले आहेत. तर हैदराबाद संघाने केवळ सात सामने जिंकले आहेत.


आयपीएल 2021 च्या पूर्वार्धात जेव्हा हे दोन संघ समोरासमोर आले, तेव्हा इऑन मॉर्गनच्या संघाने विजय मिळवला. उजव्या हाताचा स्फोटक फलंदाज नितीश राणा त्या सामन्यात केकेआरच्या विजयाचा नायक ठरला होता. नितीश राणाने 56 चेंडूत 80 धावांची खेळी खेळली होती. कोलकात्याने त्या सामन्यात प्रथम खेळताना 187 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल हैदराबाद संघाला केवळ 177 धावाच करता आल्या. केकेआरने हा सामना 10 धावांनी जिंकला होता.


आजच्या सामन्यातही कोलकाता नाईट रायडर्सची जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. केकेआरच्या टीममध्ये व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्तीसारखे अनेक स्टार खेळाडू आहेत. त्याचबरोबर हैदराबादचा संघ पूर्णपणे कर्णधार केन विल्यमसनवर अवलंबून आहे. संघाची मधली फळी पूर्णपणे तरुण आणि कमकुवत आहे.


संबंधित बातम्या :