Rajasthan vs Chennai: इंडियन प्रीमियर लीग सीझन 14च्या   47 व्या  सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जवर सात विकेटने मात केली आहे. चेन्नईने  20 षटकात चार विकेट गमावत 189 धावांचे आव्हान दिले. राजस्थान हे आव्हान हे  तीन विकेट गमावत हे आव्हान पूर्ण केले. आजच्या विजयामुळे राजस्थान रॉयल्सची प्लेऑफच्या शर्यतीत अजून आहे.


राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत खेळलेल्या  12 सामन्यांपैकी राजस्थानचा हा पाचवा विजय आहे. आजच्या विजयामुळे पॉईंट टेबलमध्ये राजस्थान सहाव्या क्रमांकावर आली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे  कोलकाता नाइट राइडर्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स और मुंबई इंडियन्सचे गुण सारखे आहे. यापैकी एकच संघ प्लेऑफमध्ये पुढे जाणार आहे. 


राजस्थानच्या या विजयाचा शिल्पकार यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे आहे. जयस्वालने 19 बॉलमध्ये अर्धशतक झळकवले. जयस्वालने 21 बॉलमध्ये 50 धावा करत तंबूत परतला. तर शिवम दुबेने नाबाद 64 धावा केल्या. 


ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीने 47 धावांची भागीदारी करत चेन्नईला चांगली सुरुवात मिळवून दिली. त्यानंतर आलेल्या मोईन अली, सुरेश रैना आणि अंबाती रायुडूला फार चांगली कामगिरी करता आली नाही.


दोन्ही संघांचे संभाव्य संघ :


CSK Playing 11 : फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), सैम कर्रन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर आणि जोश हेजलवुड. 


RR Playing 11: संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), एविन लुईस, यशस्वी जायसवाल, लियाम लिविंगस्टोन/डेविड मिलर, महिपाल लोमरोर, रियान पराग/शिवम दुबे, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रहमान, चेतन सकारिया, जयदेव उनादकट.