एक्स्प्लोर

IND vs NZ, 2nd ODI, Pitch Report : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कशी असेल मैदानाची स्थिती, जाणून घ्या पिच रिपोर्ट सविस्तर

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे.

India vs New Zealand, 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून आता दुसरा सामना आज दुपारी खेळवला जाणार आहे. मालिकेतील हा दुसरा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान आजचा सामना भारताला जिंकून मालिका जिंकता येईल तर न्यूझीलंडला सामना जिंकून बरोबरी साधता येईल. यामुळे आजच्या महत्त्वाच्या सामन्यात मैदानाची खेळपट्टी (Pitch Report) कशी आहे अर्थात पिच रिपोर्ट जाणून घेऊ... 

रायपूर क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल

सामना होणाऱ्या रायपूर क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी भारतातील इतर विकेट्सप्रमाणे फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथील विकेट टी-20 सामन्यांसारखी असेल ज्याच्या सरासरीने 170 धावा केल्या होत्या. पण जसजसा खेळ पुढे जाईल तसतशी इथली खेळपट्टी स्लो होत जाईल. म्हणजे वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटू अधिक प्रभावी ठरतील. रायपूरची विकेट पाहता नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारल्यानंतर फिरकीपटूंच्या माध्यमातून नंतर फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव आणणे ही कर्णधारांची रणनीती असणार यात शंका नाही. त्यामुळे पहिल्या वन-डेप्रमाणे एक हायस्कोरिंग सामना पाहायला मिळू शकतो. विशेष म्हणजे रायपूरच्या या मैदानात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जात आहे...

View this post on Instagram
 
A post shared by Team India (@indiancricketteam)

कसं असेल कोलकात्याचं वातावरण?

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सामन्यादिवशी अर्थात आज दुपारनंतर रायपूरमध्ये थोडीशी थंडी असेल. दिवसाचे तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. रात्री तापमानात घट होईल आणि पारा 19 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरेल. भारत-न्यूझीलंड सामन्याच्या दिवशी रायपूरमध्ये पावसाची शक्यता नाही. त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हवामानाशी संबंधित कोणताही अडथळा नसावा अशी अपेक्षा आहे.

भारत जिंकल्यास मालिकाही होणार नावावर

भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे जर आता दुसरा एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला तर भारत एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेऊन मालिकाही नावावर करेल. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ मालिकेत बरोबरी साधून आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?

व्हिडीओ

Ashish Shelar PC : ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही, सत्तेसाठी एकत्र, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Embed widget