एक्स्प्लोर

IND vs ZIM, Head to Head Record : भारत-झिम्बाब्वे सामन्यांमध्ये कोणाचं पारडं जड? कसा आहे आजवरचा इतिहास?

Ind vs Zim : पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) संघाला मात देत मालिका जिंकली असून आता व्हाईट वॉश देण्याची नामी संधी भारताकडे आहे.

India vs Zimbabwe, ODI Record : भारत-झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताने जिंकली असून आता औपचारिकता म्हणून तिसरा सामना खेळवला जात आहे. दरम्यान आजवरच्या इतिहासातही या मालिकेप्रमाणे भारताने कमाल कामगिरी केली आहे. भारताने झिम्बाब्वेला अधिकवेळा मात दिली आहे. दरम्यान आता तिसरा सामना (3rd ODI) भारताने जिंकल्यास भारत झिम्बाब्वेला व्हाईट वॉश देईल. तर झिम्बाब्वे सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या मालिकेतील अखेरच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ...

भारत- झिम्बाब्वे ODI Head to Head

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि झिम्बाब्वे संघ आतापर्यंत 65 वेळा आमने सामने आले आहेत. यावेळी भारताचं पारडं कमालीचं जड राहिलं असून भारताने या सामन्यांतील 53 सामने जिंकले आहेत. तर, 10 सामने झिम्बाब्वेने जिंकले आहेत. याशिवाय, दोन सामना अनिर्णित देखील राहिले आहेत. दरम्यान भारताने आताच इंग्लंड आणि वेस्ट इंडीज अशा दोघांना तगडी मात दिली असल्याने आता झिम्बाब्वेलाही भारत मात देण्यास सज्ज झाला आहे. 

भारतीय संघ - केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाझ अहमद.

झिम्बाब्वे संघ -  रेगीस चकाब्वा (कर्णधार), रायन बुर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदीवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायुची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो.

भारतीय संघात बदल?

भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून स्वत:च्या नावे केली आहे. पण आता औपचारिकता म्हणून तिसरा सामना खेळवला जाणार आहे. अशामध्ये भारताला झिम्बाब्वेला त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश देण्याची नामी संधी देखील आहे. अशामध्ये भारतीय संघ अंतिम 11 मध्ये एक बदल करण्याची शक्यता आहे. हा बदल म्हणजे या मालिकेसाठी भारतीय संघाचं तिकिट मिळालेल्या राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याला संघात एन्ट्री मिळण्याची संधी आहे. भारताकडे सलामीवीर आणि यष्टीरक्षक अशा जबाबदाऱ्यांसाठी वेगवेगळे पर्याय असल्याने ईशानला आशिया कपसाठी विश्रांती दिल्याने. ईशान किशनच्या जागी राहुल खेळू शकतो. 

अशी असू शकते भारताची अंतिम 11

सलामीवीर - केएल राहुल आणि शिखर धवन

मिडिल ऑर्डर फलंदाज - दीपक हुडा, शुभमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर) आणि ईशान किशन/राहुल त्रिपाठी. 

ऑलराउंडर- अक्षर पटेल

गोलंदाज - कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा. 

हे देखील वाचा - 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget