KL Rahul Ind vs Aus Test : रोहित शर्माचे बलिदान व्यर्थ, KL राहुल दोन्ही डावात फ्लॉप; तिसऱ्या कसोटीतून पत्ता कट?
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची दुसरी कसोटी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये खेळली जात आहे.
Australia vs India Test : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची दुसरी कसोटी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये खेळली जात आहे. ज्यामध्ये टीम इंडिया बॅकफूटवर दिसत आहे, तर ऑस्ट्रेलियन संघाची पकड मजबूत असल्याचे दिसत आहे. भारताच्या 180 धावांना प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 337 धावा केल्या. त्याचबरोबर दुसऱ्या डावातही टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली होती. सलामीवीर केएल राहुल केवळ 7 धावा करून आऊट झाला. राहुलची बॅट सलग दुसऱ्या डावात शांत राहिली.
पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात यशस्वी-राहुल जोडीने कमाल केली होती. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 201 धावांची भागीदारी झाली होती. यशस्वीने 297 चेंडूत 161 धावा केल्या होत्या. तसेच केएल राहुलने 176 चेंडूंचा सामना करत 77 धावांची खेळी केली. अशा परिस्थितीत रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत परतला तेव्हा त्याने सलामीच्या जोडीशी छेडछाड केली नाही. त्याने फलंदाजीचा क्रम बदलला आणि खालच्या मधल्या फळीत मैदानात उतरला.
No catch drop No party for KL Rahul.
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) December 7, 2024
This fraud KL Rahul never perform when team needs him. Rohit Sharma should open from next match. pic.twitter.com/T0u7fCI4DU
भारतीय संघ व्यवस्थापनाचा हा प्रयोग दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरला. यशस्वी जैस्वालने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात एकही धाव काढली नाही. दुसरीकडे, केएल राहुलने 64 चेंडूत 37 धावा केल्या. 2018 नंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोहित शर्माला 23 चेंडूत केवळ 3 धावा करता आल्या. दुसऱ्या डावातही हा प्रयोग फसला. केएल राहुलला 10 चेंडूत केवळ 7 धावा करता आल्या. चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असलेली यशस्वी जैस्वाल 31 चेंडूत 24 धावा करून आऊट झाला. स्कॉट बोलँडने त्याला ॲलेक्स कॅरीच्या हाती झेलबाद केले.
Kl rahul what a fraud. Never stands tall in pressure situations.
— Prathmesh. (@45Fan_Prathmesh) December 7, 2024
Man Rohit Sharma did wrong by sacrificing his opening position. 😞#INDvsAUS pic.twitter.com/EV6VAgb2BO
रोहित शर्माने स्वतः ओपनिंग करण्याऐवजी राहुलला ही संधी दिली. पण राहुलची फ्लॉप कामगिरी पाहता हिटमॅनचे बलिदान व्यर्थ गेल्याचे दिसते. मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या रोहितची बॅटही पहिल्या डावात नि:शब्द राहिली. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कॉम्बिनेशनमध्ये पुन्हा बदल पाहिला मिळू शकतो. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा ओपनिंग करण्यासाठी येऊ शकतो.
हे ही वाचा -