KL Rahul : बांगलादेश मालिकेतून केएल राहुलचा होणार पत्ता कट? दुलीप ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात खाल्ली 'माती'
India Squad For Bangladesh Test Series : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील अनेक मोठे स्टार्स टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्याच्या इराद्याने देशांतर्गत दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये खेळत आहे.
KL Rahul in Duleep Trophy : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील अनेक मोठे स्टार्स टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्याच्या इराद्याने देशांतर्गत दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये खेळत आहे. यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, ऋतुराज गायकवाड आणि रजत पाटीदार यांसारखी मोठी नावे दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी फ्लॉप ठरली. या खेळाडूंनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना केएल राहुलकडून मोठ्या अपेक्षा होत्या. सुरुवातीला असे वाटत होते की KL अपेक्षा पूर्ण करेल पण नंतर त्याने पण माती खाल्ली.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली दुलीप ट्रॉफीमध्ये केएल राहुलचा भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे. सामन्याच्या दुस-या दिवशी राहुल 23 धावा करून नाबाद परतला आणि तिसऱ्या दिवशी आल्यावर तो मोठी खेळी खेळून आपली धावसंख्या सुधारेल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही आणि राहुलला कालची धावसंख्या केवळ 14 धावांनी वाढवता आली. अशा प्रकारे त्याने 111 चेंडूंचा सामना केला आणि त्याच्या बॅटमधून केवळ 37 धावा आल्या. स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात राहुलला वॉशिंग्टन सुंदरने बोल्ड केले.
टीम इंडियाला या महिन्यात 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सलामीवीर म्हणून खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आणि विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळेल.
केएल राहुलवर टांगती तलवार
टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठीची खरी लढाई मधल्या फळीची असल्याचे दिसते. खरंतर, बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत केएलला संधी मिळणार नसल्याच्या बातम्या येत आहेत. यामागे सरफराज खान, रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यरसारखे खेळाडू आहेत. यापैकी कोणीही अद्याप दुलीप ट्रॉफीमध्ये खेळले नसले तरी केएल राहुलसाठी या तिन्ही फलंदाजांना एकत्रितपणे सामना करणे फार कठीण जाणार आहे.
या वर्षी जानेवारीमध्ये केएल राहुलचा इंग्लंडविरुद्धच्या संघात स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला होता. हैदराबादमधील पहिल्या कसोटीत 86 धावांची शानदार खेळी केल्यानंतर राहुल दुखापतीमुळे शेवटच्या चार कसोटीत खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत रजत पाटीदार आणि सरफराज खान यांना पदार्पणाची संधी मिळाली. रजतला फलंदाजीत विशेष काही करता आले नाही पण सरफराजने पदार्पणाच्या सामन्याच्या दोन्ही डावात अर्धशतके झळकावण्याचा पराक्रम केला. सरफराजने तीन कसोटीत तीन अर्धशतके झळकावून राहुलला थेट टक्कर दिली.
रजत पाटीदार आतापर्यंत टीम इंडियासाठी बॅटने योगदान देऊ शकला नसेल, परंतु सध्या तो देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम लाल-बॉल फलंदाजांपैकी एक आहे आणि जर त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये छाप पाडली, तर निवडकर्ते त्याच्या नावावर विचार करू शकतात. आणि असे झाले तर केएल राहुल टीम इंडियात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत खूप मागे पडेल. दरम्यान, श्रेयस अय्यरही टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या विचारात आहे. इतक्या खेळाडूंच्या शर्यतीत केएल राहुलला पुढे जाणे फार कठीण जाऊ शकते.
हे ही वाचा -