(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kieron Pollard : पोलार्डचा जोरदार षटकार, कॉमेंट्री करणारा कुमार संगकारा थोडक्यात बचावला, पाहा काय घडलं? Video
Kieron Pollard: वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू कायरन पोलार्डनं एक दमदार षटकार मारला.यावेळी कुमार संगकारा जखमी होण्यापासून थोडक्यात बचावला.
लंडन: इंग्लंडमध्ये सध्या द हंड्रेड (The Hundred) टुर्नामेंट सुरु आहे. द हंड्रेड स्पर्धेत जगभरातील मोठ मोठे क्रिकेटपटू खेळतात. सध्या वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू कायरन पोलार्डचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडीओत पोलार्डनं असा दमदार षटकार मारला. मात्र, त्या मॅचमध्ये कॉमेंट्री करणारा कुमार संगकारा थोडक्यात बचावला. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कायरन पोलार्डनं(Kieron Pollard) मारलेला बॉल आपल्या दिशेनं येत असताच कुमार संगकारा (Kumar Sangakara) यानं जागा सोडली, त्यामुळं तो बचावला.
व्हिडीओ जोरदार व्हायरल
सोशल मीडियावर कायरन पोलार्डच्या षटकाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ द हंड्रेड कडून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून पसंती मिळत आहे. नेटकरी या व्हिडीओवर कमेंट करत आहेत.
पाहा व्हिडीओ
When @RDBCroft10's life flashed before his eyes 😵#TheHundred pic.twitter.com/trHo8UbgN3
— The Hundred (@thehundred) August 5, 2024
पोलार्डच्या संघाचा विजय
या मॅचमध्ये कायरन पोलार्डनं संघासाठी 12 बॉलवर 17 धावा केल्या. पोलार्डची टीम साउदर्न ब्रेवनं 20 ओव्हरमध्ये 139 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना वेल्श फायरचा संघ 97 धावांवर बाद झाला.
साउदर्न ब्रेवनं वेल्श फायरचा 42 धावांच्या फरकानं पराभव केला. या विजयानंतर साउदर्न ब्रेव गुण तालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. साउदर्न ब्रेवचे 5 मॅचमध्ये 8 गुण आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या ओवल इन्विजिबलकडे 6 गुण आहेत. ही स्पर्धा 23 जुलै रोजी सुरु झाली होती. या स्पर्धेचा अंतिम सामना 18 ऑगस्टला होणार आहे.
संबंधित बातम्या :
IND vs SL: रोहित-कोहलीची गरज होती का?; गौतम गंभीरच्या रणनीतीवर आशिष नेहराने उपस्थित केले प्रश्न