Watch Video : कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये पोलार्डने पकडलेला हा अफलातून कॅच पाहाच!
CPL 2022 : कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत कायरन पोलार्डने सेंट लूसिया किंग्स संघाच्या अल्जारी जोसेफचा सीमा रेषेवर पकडलेला झेल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
CPL 2022 : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड (Keiron Pollard) हा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जातो. गुरुवारी पोलार्डने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL 2022) एक अगदी अफलातून झेल पकडला. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी सेंट लुसिया किंग्ज विरुद्ध त्रिनबागो नाईट रायडर्स संघ आमनेसामने होते. यावेळी पोलार्डने सेंट लुसिया किंग्जच्या अल्झारी जोसेफचा झेल पकडला. अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर जेडॉन सील्सची गोलंदाजी सुरु असताना हा झेल पोलार्डने टिपला.
कॅरेबियन प्रीमियर लीगमधील सेंट लुसिया किंग्स विरुद्ध त्रिनबागो नाइट रायडर्स सामना सुरु होता. यावेळी अल्झारी जोसेफ स्ट्राईकवर असताना जॅडॉन सील्स त्याला गोलंदाजी करत होता. अल्झारीने यावेळी एक मोठा फटका मारला, सुरुवातीला चेंडू सहज सीमारेषेबाहेर जाईल असे वाटत होते, पण त्याचवेळी कायरन पोलार्डने जवळपास अशक्य असलेला झेल घेत सर्वांनाच चकित केले. अल्झारी जोसेफचा हा फटका कायरन पोलार्डने आधी सीमारेषेबाहेर टाकला, त्यानंतर उत्कृष्ट संतुलन साधत झेल टिपला.
WOW. No way did @KieronPollard55 pull that off. Needed every bit of his height and experience for that catch!
— FanCode (@FanCode) September 1, 2022
Catch all the action from the CPL T20 LIVE, only on #FanCode 👉 https://t.co/fGoM6YH5wd @CPL @TKRiders
#CaribbeanPartyOnFanCode #CPLT20 #CricketPlayedLouder pic.twitter.com/vEiIfpyfS9
हे देखील वाचा-