एक्स्प्लोर

Kedar Jadhav : केदार जाधवच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता! कौटुंबिक कारण देत रणजीतून माघार घेतली अन् बारामतीत...

Kedar Jadhav : बराच काळापासून टीम इंडियातून बाहेर असणारा केदार जाधव यंदा रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करत होता, पण आता त्याने कौटुंबिक कारण देत रणजी सामन्यातून माघार घेतली होती.

Kedar Jadhav : भारतीय फलंदाज केदार जाधव (Kedar Jadhav) सध्या टीम इंडियामध्ये (Indian Cricket Team) नसल्याचंच दिसून येत आहे. त्यात आयपीएलमध्येही (IPL) त्याला कोणत्या संघाने विकत न घेतल्याने तो मैदानातच दिसत नव्हता. पण यंदाच्या रणजी स्पर्धेत त्याने काही चांगल्या खेळी केल्या, ज्यानंतर तो पुन्हा चर्चेत आला होता. पण आता या सगळ्यामध्येच त्याच्या एका कृतीमुळे तो अडचणीत येईल असं दिसून येत आहे. केदारने कौटुंबिक कारण देत रणजी सामना मध्येच सोडला. ज्यानंतर तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासोबत बारामतीत एका कार्यक्रमात दिसला. दरम्यान हे असं वागणं शिस्तभंग असल्याचं सांगत त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही मागणी केली आहे.

नेमकं घडलं काय?

रणजी स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या केदार जाधवने आसाम विरुद्ध अप्रतिम द्विशतक झळकावलं होतं. पण त्यानंतर काही दिवसांत त्याने खाजगी कारण देत तो महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू रणजी सामना अर्ध्यावरती सोडून बाहेर पडला. ज्यानंतर बारामती येथे तो एका कार्यक्रमात दिसून आला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासोबत केदार दिसून आला. दरम्यान एक महत्वाची क्रिकेट स्पर्धा सुरु असताना असं खोटं कारण देत त्यातून बाहेर पडणं चुकीचं आहे. याबाबत बीसीसीआयकडे तक्रार करणार असून  कितीही मोठा खेळाडू असला तरी असं वागणं बरोबर नाही. असं करायचं असल्यास क्रिकेट सोडून घरी बसावं, असंही पाटील यावेळी म्हणाले.

केदार जाधवची कमाल फलंदाजी

बराच काळ मैदानापासून दूर असणाऱ्या केदारनं काही दिवसांपूर्वी आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. जाधवची फलंदाजी सर्वांसाठीच चर्चेचा विषय बनली होती. सामन्यात त्याने एकदिवसीय शैलीत फलंदाजी करताना 283 चेंडूत 283 धावा केल्या. या खेळीत त्याने 21 चौकार आणि 12 षटकार मारले. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे महाराष्ट्र मजबूत स्थितीत पोहोचला होता. केदारने बऱ्याच कालावधीनंतर एवढी मोठी खेळी केली होती.

आयपीएल लिलावात राहिला 'अनसोल्ड'

इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) स्पर्धेत सीएसके संघाकडून खेळणारा केदार जाधव सीएसकेपासून (CSK) वेगळा झाल्यानंतर त्याला आयपीएल लिलावात कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतलेले नाही. गेल्या दोन हंगामात तो आयपीएल लिलावात अनसोल्डच राहिला.मागील वर्षी 23 डिसेंबर रोजी झालेल्या 2023 च्या आयपीएल लिलावातही (IPL Mini Auction) त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. यापूर्वी तो CSK संघाचा भाग होता. त्याच वेळी, फेब्रुवारी 2020 नंतर त्याला भारतीय संघातूनही वगळण्यात आले. मात्र आसामविरुद्ध 283 धावांची धडाकेबाज खेळी केदार जाधवने केल्यामुळे तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला होता.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Devendra Fadanvis : आम्ही देशभक्त, मोदीभक्त नाही; फडणवीसांना ठाकरेंचं उत्तरTushar Gandhi : कट्टरवादी हिंदुत्वामार्फत लोकांमध्ये भेदभाव, तुषार गांधींची भाजपवर टीकाUddhav Thackeray Kalachowki Full Speech : शेवटची सभा, शेवटचं भाषण, काळाचौकीत ठाकरेंचा निर्धारUddhav Thackeray Mumba Devi Darshan : प्रचार संपला,  उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
Embed widget