Kane Williamson Central Contract: केन विल्यमसन (Kane Williamson) याच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघ 2024 टी 20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला. या स्पर्धेत न्यूझीलंडकडून अत्यंत खराब कामगिरी झाली. आता विल्यमसनने न्यूझीलंडच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा (Kane Williamson Stepped Down As New Zealand Captain) आणि 2024-25 हंगामासाठी केंद्रीय करार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडसाठी उपलब्ध असेल, असे केन विल्यमसनने स्पष्ट केले.






न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विल्यमसन उन्हाळ्यात परदेशी लीग खेळण्याची संधी शोधत आहे. या कालावधीत तो न्यूझीलंडकडून खेळू शकणार नाही, त्यामुळे त्याने केंद्रीय करार न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, न्यूझीलंडकडून खेळण्यासाठी नेहमीच तयार असल्याचे विल्यमसनने सांगितले. याशिवाय विल्यमसनने आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची इच्छाही व्यक्त केली. मात्र, विल्यमसनने न्यूझीलंडला नेहमीच प्राधान्य देण्यावर भर दिला.






विल्यमसनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द-


विल्यमसनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत 100 कसोटी, 165 एकदिवसीय आणि 93 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 8743 धावा, एकदिवसीय सामन्यात 6810 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 2575 धावा केल्या आहेत. विल्यमसनने कसोटीत 32 आणि एकदिवसीय सामन्यात 13 शतके झळकावली आहेत.


विल्यमसनच्या नेतृत्वाखाली हे पराक्रम 


प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या विल्यमसनची गणना आधुनिक क्रिकेटमधील महान खेळाडूंमध्ये केली जाते. तो 10 वर्षांहून अधिक काळ न्यूझीलंडच्या फलंदाजीचा प्राण आहे. विल्यमसनच्या नेतृत्वाखाली, न्यूझीलंडने 2015 आणि 2019 एकदिवसीय विश्वचषक, 2021 टी-20 विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली, जी न्यूझीलंडने जिंकली. या चारपैकी तीन स्पर्धांमध्ये विल्यमसन न्यूझीलंडचे नेतृत्व करत होता.


संबंधित बातम्या:


Net Worth Of Gautam Gambhir: क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही कमाईत चौकार-षटकार; गौतम गंभीरची संपत्ती किती?


T20 World Cup 2024: 'दीवाली हो या होली, अनुष्का....'; भर मैदानात प्रेक्षकांच्या घोषणा, विराट कोहलीने काय केलं?, Video


T20 World Cup 2024 Ind vs USA: पहिले विराट कोहली, मग रोहित शर्माला माघारी धाडलं; कोण आहे सौरभ नेत्रावळकर?