The Ashes : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मागील 140 वर्षांपासून खेळल्या जाणाऱ्या अॅशेस मालिकेत एकापेक्षा एक दमदार खेळाडू जगासमोर आले आहेत. यामध्ये फलंदाज, गोलंदाज अशा अनेकांनी चमकदार कामगिरी केली आहे. दरम्यान सर्वाधिक शतकांचा विचार करता ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांनी सर्वाधिक शतकं लगावली आहेत. त्यांनी मालिकेत एकूण 19 शतकं ठोकली असून ब्रॅडमन यांच्यासह आणखी 3 खेळाडूंनीही 10 पेक्षा अधिक शतकं लगावली आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघात सध्या असणारा स्टीव्ह स्मिथ याचाही समावेश आहे. तर या यादीवर एक नजर फिरवूया...


1. सर डॉन ब्रॅडमंन : क्रिकेटच्या इतिहासातील एक दिग्गज खेळाडू अशी ओळख असणाऱ्या ब्रॅडमन यांनी 1928 ते 1948 या काळात झालेल्या अॅशेस मालिकेत 37 सामने खेळले. ब्रॅडमन यांनी या सामन्यांमध्ये 89.78 च्या सरासरीने 5 हजार 28 रन केले आहेत. अॅशेस मालिकेत एका खेळाडूने बनवलेले हे सर्वाधिक रन असून यामध्ये 19 शतकांचा समावेशा आहे. ब्रॅडमन यांच्या रेकॉर्डच्या आसपासही कोणता खेळाडू नाही.


2. जॅक हॉब्स : या यादीत असणारा एकमेव इंग्लंडचा खेळाडू म्हणजे जॅक हॉब्स. जॅक यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण 15 शतकं लगावली. ज्यातील 12 शतकं ही अॅशेस मालिकेत त्यांनी ठोकली होती.  हॉब्स यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 41 सामन्यात 54 च्या सरासरीने 3 हजार 636 रन बनवले.  1908 ते 1930 दरम्यान खेळलेल्या अॅशेस मालिकेत जॅक यांनी ही कामगिरी केली होती.


3.स्टिव स्मिथ : ऑस्ट्रेलियाच्या संघात सध्या असणारा महत्त्वाचा फलंदाज स्टीव स्मिथ याने अॅशेस मालिकेत 29 सामन्यात 11 शतकं लगावली आहेत. आतापर्यंत त्याने 65 च्या सरासरीने 2 हजार 900 हून अधिक धावा केल्या आहेत. तो आणखी दोन शतकं ठोकून जॅक हॉब्स यांना मागे टाकू शकतो. 


4.स्टिव वॉ : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव वॉ याने 45 अॅशेस सामन्यात 10 शतकं लगावली आहेत. वॉने 59 च्या सरासरीने 3 हजार 173 रन केले आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha