South Africa vs India 3rd ODI: केपटाऊनच्या Newlands मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा आणि मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना सुरु आहे. सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली आहे. तर चार बदलांसह संघ मैदानात उतरला आहे. दरम्यान यातील एक बदल म्हणजे अष्टपैलू खेळाडू जयंत यादव याला एकदिवसीय संघात तब्बल सहा वर्षांनी स्थान मिळालं आहे.
यादवने त्याचा पहिला आणि शेवटचा एकदिवसीय सामना 2016 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला या प्रकारात एकदाही मैदानावर उतरण्याची संधी मिळाली नाही. अष्टपैलू असूनही त्याला अधिक सामने खेळला आलेले नाहीत. त्याच्या जागी रवीचंद्रन आश्विन, रवींद्र जाडेजा असे दिग्गज असल्याने त्याला अधिक संधी मिळालेली नाही. पण आज मिळालेल्या संधीचे तो सोने करतो का हे पाहावे लागेल.
चार बदलांसह टीम इंडिया मैदानात
तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने अंतिम 11 मध्ये चार बदल केले आहेत. यात सूर्यकुमार यादव, जयंत यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि दीपक चाहर यांना संधी मिळाली आहे. तर भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, व्यंकटेश अय्यर आणि आर. आश्विन यांना विश्रांती दिली आहे.
भारत अंतिम 11 - केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, जयंत यादव, प्रसिद्ध कृष्णा, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.
हे देखील वाचा-
- ICC T20I Player of Year: पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचं मोठं यश, आयसीसी टी20 प्लेयर ऑफ द इयर म्हणून जाहीर
- IND Vs SA, 3rd ODI LIVE: भारत- दक्षिण आफ्रिकादरम्यान तिसरा सामना, प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
- IPL 2022 : आयपीएल 2022 चा थरार भारतातच ; BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha