IND vs SA 3rd ODI : भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत (One Day Series) भारताचा दोन सामन्यात पराभव झाला आहे. परंतु, आज होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्लीन स्वीप टाळण्यासाठी भारतीय संघ काही बदलांसह मैदानात उतरू शकतो.  


पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाची रणनीती पूर्णपणे फसल्याने संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मधल्या षटकांमध्ये फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही तर जसप्रीम बुमराह वगळता उर्वरित भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांना केवळ सात गडी बाद करता आले. बुमराहने पहिल्या सामन्यात चार तर दुसऱ्या सामन्यात तीन गडी बाद केले. 
 
दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर रविचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार सारखे अनुभवी गोलंदाज अपयशी ठरले आहेत. पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यामुळे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पुढील आजच्या संघात काही बदल करू शकतात.  


दरम्यान, के.  एल. राहुलने पहिल्या दोन सामन्यांमध्ये फलंदाजीत निराशा केली. एकदिवसीय सामन्यांमध्ये आवश्यक असणारा स्ट्राईक रोटेट करण्यात तो अपयशी ठरला. तर विराट कोहलीने पहिल्या सामन्यात 51 धावा केल्या. याशिवाय अय्यर श्रेयस आणि व्यंकटेश हे दोघेही आतापर्यंत छाप पाडू शकलेले नाहीत, ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.


दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 7 विकेटने पराभव 
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा सात विकेटने पराभव केला. भारताने दिलेलं 288  धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाने तीन गड्यांच्या मोबदल्यात यशस्वी पार केलं. या विजयासह दक्षिण आफ्रिका संघाने तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला 31 धावांनी पराभव पत्कारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात पराभव झाल्यामुळे कसोटीनंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकाही गमावली. 


महत्वाच्या बातम्या