ICC T20I Player of Year: मागील वर्ष अर्थात 2021 टी20 क्रिकेटसाठी अगदी धमाकेदार होतं. आयपीएलसह इतर देशांच्या स्थानिक स्पर्धांसह आयसीसी टी20 विश्वचषक अशा विविध टी20 स्पर्धांमुळे यंदाच्या वर्षी भरपूर टी20 सामने खेळले गेले. ज्यामुळे अनेक नवे रेकॉर्ड देखील स्थापन झाले. यामध्ये अप्रतिम बॅटिंगमुळे वर्षभरात सर्वाधिक टी20 धावा करण्याचा मान पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने मिळवला, ज्यामुळे यंदाचा आयसीसी टी20 प्लेयर ऑफ इयर (ICC T20 Player Of Year) पुरस्कारही त्यालाच मिळाला आहे. 



पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) सलामीवीर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) 2021 या वर्षात कमालीच्या फॉर्ममध्ये यावेळी त्याने अनेक रेकॉर्ड्सही केले.  त्याने 2021 वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात मध्ये 1200 धावा पूर्ण केल्या. त्याने 27 सामन्यातील 24 डावांत ही कामगिरी केली आहे. रिजवानने वर्षभरात टी20 सामन्यात 11 अर्धशतकं आणि एक शतक झळकावलं. रिझवानचा बेस्ट स्कोर 104 धावा इतका होता. याशिवाय रिझवानने वर्षभरात 105 चौकार लगावले. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे. रिझवानने आतापर्यंत 12 अर्धशतकं लगावली आहेत. 52 सामन्यात त्याने 49.51 च्या सरासरीने 1 हजार 436 धावा केल्या आहेत. तर सर्व टी20 सामन्यांचा विचार करता 135 डावांत 39 च्या सरासरीने त्याने 3 हजार 862 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे.


ही होती 4 नावं 


या यादीमध्ये इंग्लंडचा जोस बटलर, पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान, श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श यांचा समावेश होता. यामध्ये पाकिस्तानच्या रिझवानने अनेक टी20 रेकॉर्ड नावे केल्याने त्याला पुरस्कार मिळाला. तर बटलरने वर्षभरात इंग्लंडकडून अनेक सामन्यात दमदार कामगिरी केली होती. तर वानिंदूने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही बाजूने श्रीलंका संघासाठी कमाल केली होती. ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकवण्यात मिचेल मार्शने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे या चौघांची नावं पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आली होती.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha