एक्स्प्लोर

Jasprit Bumrah : 'पुनरागमन हे माघार घेण्यापेक्षा कधीही भारीच,' बुमराहचं 'ते' ट्वीट व्हायरल

Bumrah's Tweet Viral : दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आता आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात नसणार असल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप याबाबत अधिकृत वक्तव्य बीसीसीआयकडून आलेलं नाही.

Jasprit Bumrah's Tweet Viral : भारतीय क्रिकेट संघातील सध्याचा आघाडीचा गोलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah). मागील काही वर्षात आपल्या भेदक गोलंदाजीने संघाचा सर्वात विश्वासू गोलंदाज झालेला बुमराह आता मात्र दुखापतीचा सामना करत आहे. आगामी टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धा तोंडावर आली असताना बुमराहला पाठीची दुखापत झाल्यामुळे तो स्पर्धेला मुकणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण या साऱ्या चर्चेदरम्यान बुमराहचं जवळपास 5 वर्षांपूर्वीचं म्हणजेच 2017 सालचा एक ट्वीट व्हायरल होत आहे.

बुमराहने 28 ऑगस्ट, 2017 रोजी त्याच्या अधिकृत ट्वीटरवरुन त्याचा एक मैदानातील टीम इंडियाच्या जर्सीतील पाठम्होरा फोटो पोस्ट केला आहे. याला त्याने एक दमदार असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये त्याने 'The comeback is always greater than the setback' असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे या फोटोतून बुमराह 'पुनरागमन हे माघार घेण्यापेक्षा कधीही भारीच,' असं म्हणत आहे. आता दुखापतीमुळे अडचणीत असलेल्या बुमराहचं हे ट्वीट चाहते व्हायरल करत असून यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. तसंच बुमराह लवकरच पुनरागमन करेल अशी आशाही व्यक्त करत आहेत.

इंग्लंडविरुद्ध दौऱ्यात दुखापतग्रस्त झालेला बुमराह आशिया कपही खेळू शकला नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी20 सामने तो खेळला. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी सराव करताना जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली, ज्यामुळं संघ व्यवस्थापनानं बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो गुरुवारी (29 सप्टेंबर)समोर आलेल्या माहितीनुसार जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळणार नसल्याचं पीटीआयनं बीसीसीआयच्या सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलं. 

बुमराहची दुखापत चिंता वाढवणारी

भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा आधीच गुडघ्याच्या दुखापतीमुळं संघाबाहेर आहे. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळं संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेला मुकावं लागलंय. त्यानंतर आता जसप्रीत बुमराहच्या दुखपतीनं टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. बीसीसीआयमधील सुत्रांच्या माहितीनुसार, दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह विश्वचषक खेळण्याची शक्यता नाही. बुमराहच्या दुखापतीनं भारताच्या चिंतेत भर पडली आहे. कारण आधी रवींद्र जाडेजा त्यानंतर आता जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडलाय. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd Test Day-2 : पाच विकेट्स घेऊन आकाशदीप चमकला, पण बुमराहच्या खात्यात भोपळा! न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांवर गुंडाळला
पाच विकेट्स घेऊन आकाशदीप चमकला, पण बुमराहच्या खात्यात भोपळा! न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांवर गुंडाळला
6,6,6,6,6,6... एका षटकात 6 षटकार अन् 2 द्विशतकं! वैभव सूर्यवंशीनंतर आणखी दोन युवा फलंदाजांचा धमाका, एकाच सामन्यात असा विक्रम, जो पाहून सगळेच थक्क
6,6,6,6,6,6... एका षटकात 6 षटकार अन् 2 द्विशतकं! वैभव सूर्यवंशीनंतर आणखी दोन युवा फलंदाजांचा धमाका, एकाच सामन्यात असा विक्रम, जो पाहून सगळेच थक्क
IND vs NZ 2nd Test Day-2 : आकाश दीपने 4, कंबोजने 2 विकेट्स घेत किवींना हादरवलं; ब्लंडेल मात्र शतकाच्या उंबरठ्यावर, दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात काय घडलं?
आकाश दीपने 4, कंबोजने 2 विकेट्स घेत किवींना हादरवलं; ब्लंडेल मात्र शतकाच्या उंबरठ्यावर, दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात काय घडलं?
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवारांच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
शरद पवारांच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
Embed widget