Jasprit Bumrah : यशस्वी जैस्वालने सगळ्यात जास्त कॅच सोडले, दिग्गज संतापले; जसप्रीत बुमराह रागवण्याऐवजी डोकं शांत ठेवत म्हणाला...
England vs India 1st Test : लीड्समधील हेडिंग्ले येथे सुरू असलेल्या कसोटीच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेतले.

Jasprit Bumrah On Dropped Catches : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल आपण काय म्हणू शकतो... जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा कर्णधार विचार न करता बुमराहला चेंडू देतो आणि तो कधीही नाराज करत नाही. हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावातही असेच दिसून आले. जसप्रीत बुमराहची जादू चालली आणि इंग्लिश फलंदाजांनी गुडघे टेकले.
लीड्समधील हेडिंग्ले येथे सुरू असलेल्या कसोटीच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेतले. पण, यशस्वी जैस्वाल आणि रवींद्र जडेजा यांनी अनेक वेळा त्याला नाराज केले. बुमराहच्या चेंडूवरून 4 झेल सोडले. तीन वेळा ही चूक जैस्वालने केली आणि एका प्रसंगी जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या जडेजानेही एक सोपा झेल सोडला. यार भारताचे अनेक दिग्गज संतापले. पण, हे सर्व असूनही बुमराहने आपला संयम गमावला नाही आणि तो रागावलेला दिसला नाही.
आपण क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा पाहिले आहे की झेल चुकवल्यानंतर गोलंदाज आपला राग गमावून क्षेत्ररक्षकावर रागावतो, पण जसप्रीत बुमराह तसा नाही. तो म्हणाला की, "मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं. मी जेव्हा मैदानावर असतो, तेव्हा त्या क्षणांचा पुरेपूर आनंद घेतो, आणि म्हणूनच माझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं. जेव्हा कधी झेल सुटतो, तेव्हा मी समजून घेतो की कोणताही खेळाडू मुद्दाम असं करत नाही. प्रत्येक जण आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत असतो. थंड हवामानात अनेकदा चेंडूवर लक्ष केंद्रित करणं कठीण जातं, आणि ही गोष्ट मला माहीत आहे."
जसप्रीत बुमराह पुढे म्हणाला की, सामन्यात हे सर्व घडते आणि मी माझ्या भविष्यातील स्पेलवर त्याबद्दल विचार करून परिणाम होऊ देऊ इच्छित नाही. मी शक्य तितक्या लवकर या गोष्टी विसरून जाण्याचा प्रयत्न करतो.
Jasprit Bumrah will ALWAYS play cricket with a smile on his face. #ENGvIND pic.twitter.com/4kWcAHSFso
— Test Match Special (@bbctms) June 22, 2025
बुमराहने केली कपिल देव यांच्याशी बरोबरी
जसप्रीत बुमराहने हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावात 5 बळी घेऊन इतिहास रचला. त्याने माजी भारतीय स्टार अष्टपैलू कपिल देव यांच्याशी बरोबरी केली, ज्यांनी घराबाहेर 12 बळी घेतले होते. बुमराहने आता परदेशातही 12 पाच बळी घेतले आहेत.
हे ही वाचा -





















