PAK vs SL : पाकिस्तानातील स्फोटानंतर श्रीलंका संघ हादरला; संघाचे आठ खेळाडू मायदेशी परतले, सामना रद्द
PAK vs SL 2nd ODI : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sri Lanka Cricketers Return From Pakistan : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा परिणाम पाकिस्तान दौर्यावर असलेल्या श्रीलंका संघावरही झाला असून, संघातील आठ खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव गुरुवार, 12 नोव्हेंबर रोजी स्वदेश परतण्याचा निर्णय घेतला आहे. इस्लामाबादमध्ये झालेल्या या भीषण स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. श्रीलंका क्रिकेट (SLC)च्या सूत्रांनी याची पुष्टी केली आहे. या घटनाक्रमामुळे गुरुवारी रावळपिंडी येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यावर रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याआधी 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा 6 धावांनी पराभव केला होता.
तिरंगा मालिकेवरही संकटाचे सावट
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर श्रीलंका संघाने पाकिस्तान आणि झिंबाब्वेविरुद्ध त्रिकोणी मालिका खेळायची होती. मात्र, आता श्रीलंका क्रिकेटने सांगितले आहे की स्वदेश परतणाऱ्या खेळाडूंच्या जागी नवीन खेळाडू पाठवले जातील, जे पुढील सामन्यांमध्ये सहभाग घेतील. सूत्रांच्या माहितीनुसार, रावळपिंडी आणि इस्लामाबादमधील जवळीक लक्षात घेऊन खेळाडूंनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आणि घरी परतण्याची इच्छा दर्शवली.
OFFICIAL STATEMENT FROM SRI LANKA CRICKET BOARD:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 12, 2025
- Several players have requested to return home, citing safety concerns in Pakistan.
- SLC decided to continue the tour as scheduled and send replacements if anyone leaves.
2009 च्या हल्ल्याच्या आठवणी जाग्या
ही घटना पाकिस्तानातील एका काळ्या अध्यायाची आठवण करून देते. 2009 मध्ये लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमजवळ श्रीलंका संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला झाला होता. त्या वेळी महेला जयवर्धने, अजंथा मेंडिस आणि चमिंडा वास यांसारखे खेळाडू जखमी झाले होते, तर काही पाकिस्तानी सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यानंतर जवळपास 10 वर्षे कोणताही विदेशी संघ पाकिस्तान दौर्यावर गेला नाही आणि पाकिस्तानला आपले सामने यूएईसारख्या तटस्थ स्थळांवर खेळावे लागले. विशेष म्हणजे, 2019 मध्ये श्रीलंकेच्याच पाकिस्तान दौर्याने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पाकिस्तानमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा केला होता.
श्रीलंकेच्या पाकिस्तान दौर्याची सुरुवात 11 नोव्हेंबर रोजी झाली होती. दुसरा सामना 13 नोव्हेंबरला खेळवला जाणार होता, मात्र नव्या माहितीनुसार सुरक्षेच्या कारणास्तव हा सामना रद्द करण्यात आला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा जगासमोर लाजिरवाणी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
हे ही वाचा -





















