Ireland vs New Zealand: बेलफास्टच्या (Belfast) सिव्हिल सर्विस क्रिकेट क्लबमध्ये (Civil Service Cricket Club) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडनं आयर्लंडचा 88 धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडच्या विजयात ऑलराऊंडर मायकल ब्रेसवेलनं (Michael Bracewell) महत्वाची भूमिका बजावली आहे. आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यातून त्यानं टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केलीय. त्यानं टी-20 पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकात हॅट्रिक घेऊन इतिहास रचलाय. 


पदार्पणाच्या पहिल्याच षटकात हट्रिक घेणारा पहिला गोलंदाज
मायकेल ब्रेसवेलने त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच षटकात हॅटट्रिक विकेट घेतली. आयर्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेत अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरलाय. आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्याच्या 14व्या षटकात कर्णधार मिशेल सँटनरनं ब्रेसवेलच्या हातात चेंडू सोपावला. या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव दिल्यानंतर त्यानं तिसऱ्या चेंडूवर मार्क एडर, चौथ्या चेंडूवर ग्लेन फिलिप्स आणि  पाचव्या चेंडूवर बॅरी मॅकार्थीला बाद केलं. या कामगिरीसह ब्रेसवेलनं पदार्पणाच्या पहिल्याच षटकात हट्रिक घेतली. अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरलाय.


न्यूझीलंडसाठी टी-20 मध्ये हॅट्रिक घेणारा तिसरा गोलंदाज 
टी-20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडसाठी जॅकब ओरम (2009) आणि टीम साऊथीनं (2010) हॅट्रिक घेतली होती. त्यानंतर ब्रेसवेलनं हॅट्रिक घेऊन विशेष पंक्तीत स्थान मिळवलं आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघानं आयर्लंडसमोर 180 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ फक्त 91 धावांच करू शकला. या सामन्यात 88 धावांनी विजय मिळवून न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 आघाडी घेतलीय. 


आयर्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात ब्रेसवेलची दमदार कामगिरी
आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात कठीण परिस्थितीत फलंदाजीसाठी उतरलेल्या ब्रेसवेलनं 127 धावांची तुफानी खेळी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला होता.शेवटच्या षटकात संघाला 20 धावांची गरज होती आणि ब्रेसवेलनं 5 चेंडूत 24 धावा ठोकल्या होत्या. 


हे देखील वाचा-