Taipei Open 2022: भारताचा बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यपनं (Parupalli Kashyap) तैपेई ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत 40 व्या स्थानावर असलेल्या पारुपल्ली कश्यपनं चीनच्या तैपेईच्या ची यू जेनचा 24-22, 21-10 असा पराभव केलाय. याशिवाय किरण जॉर्ज (Kiran George), मिथुन मंजूनाथ (Mithun Manjunath), प्रियांशु रजावत (Priyanshu Rajawat) आणि समिया इमाद फारूकीनंही (Samiya Farooqui) दमदार प्रदर्शन करत आपपला सामना जिंकलाय.
कश्यपचं दमदार प्रदर्शन
पहिल्या सेटमध्ये चीनच्या जी यू जेननं कश्यपला कडवी टक्कर दिली. परंतु, कश्यपनं दमदार प्रदर्शन करत पहिल्या सेटमध्ये 24-22 मध्ये विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये कश्यपनं आपलं वर्चस्व कायम राखत आघाडी घेतली. त्यावेळी जेनला गुण मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागलाय. कश्यपनं विजयाची घोडदौड कायम ठेवत सामना जिंकला. कश्यपचा पुढील सामना चायनीज तैपेई बॅडमिंटनपटू चिया हाओ लीशी होणार आहे.
किरण जार्ज, मिथुन मंजूनाथ, प्रियांशू रजावतची चकमदार खेळी
जागतिक क्रमावारीत 70 व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय बॅडमिंटनपटू किरण जार्जनं अजरबॅजनच्या आदे रेस्की ड्विकाहयोचा 23-21, 21-17 असं नमवून सामना जिंकला. तर, पुरूषाच्या एकेरी सामन्यात भारताच्या बॅडमिंटनपटू मिथुन मंजूनाथनं डेनमार्कच्या किम ब्रुमचा 21-17, 21-15 असा पराभव केला. तसेच जागतिक क्रमावरीत 84 व्या क्रमांकावर असलेल्या प्रियांशु रजावतनं चीनी तैपईच्या यू सेन्ग पो विरुद्ध विजय मिळवला. त्यानं यू सेन्ग पोविरुद्ध 21-16, 21-15 असा सामना जिंकलाय.
सामिया इमाद फारूकीनंही दाखवला दम
तैपई ओपन स्पर्धेत भारतीय महिला बॅडमिंटनपटू सामिया इमाद फारूकीनं दमदार कामगिरी करून दाखवली आहे. महिला एकेरी स्पर्धेत तिनं मिलेशियाच्या किसोना सेव्हादुरैला 21-15, 21-11 असं नमवलंय.
हे देखील वाचा-