Asian Youth Weightlifting Championship: उझबेकिस्तानच्या (Uzbekistan) ताश्कंद (Tashkent) शहरात आशियाई यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप सुरू आहे. या स्पर्धेत कोल्हापूरची कन्या निकिता कमालकरनं (Nikita Sunil Kamlakar) रौप्य पदक पटकावून जगात नाव केलं. तिच्या कौशल्याचं कोल्हापूरच नव्हे तर, देशभरात कौतुक होत आहे. निकिताच्या या यशात कुटुंबाबरोबर प्रशिक्षकांनी खूप मेहनत घेतलीय. विजय माळी यांनी निकिता पाचवीत असल्यापासून तिला वेटलिफ्टिंगचे धडे दिले आहेत.
निकीतानं झबेकिस्तानमध्ये भारताचा तिरंगा फडकावला
निकिताने 55 किलो वजनी गटात 67 किलो स्नॅक आणि 95 किलो क्लीन ऍण्ड जर्क असे एकूण 163 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकलं आहे. निकितीच्या घरची परिस्थिती बेताची आहे.वडील दोन्ही पायांनी अपंग आहेत. त्यांचा चहा विक्रीचा व्यवसाय आहे. तिचे वडील शाळा, बँक, कार्यालये येथे सायकलनं जाऊन चहा विक्री करतात. तर, तिची आई खाजगी रुग्णालयात काम करते. मेक्सिको येथे झालेल्या जागतिक अजिंक्य स्पर्धेत गेल्या महिन्यात थोडक्यात तिचं पदक हुकलं होतं.
निकीताला पहिल्यापासून वेटलिफ्टिंगची आवड
निकीता ही कोल्हापूरच्या शिरोळ येथील महाविद्यालयात इयत्ता बारावीचं शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच तिला वेटलिफ्टिंगची आवड होती. मॅक्सिको येथे गेल्या महिन्यात पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र, त्यावेळी तिच्या पदरी निराशा पडली. परंतु, तिनं मनात जिद्द कायम ठेवत पुन्हा सरावाला सुरुवात केली. अखेर आशियाई यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दमदार प्रदर्शन करत तिनं रौप्य पदक जिंकलंय. हे पदक जिंकून तिनं आव्हानांसाठीची आपली भूमिका स्पष्ट केलीय.
हे देखील वाचा-