ISSF World Cup 2022: चांगवॉन नेमबाजी विश्वचषक स्पर्धेतील अखेरच्या दिवशी भारतीय नेमबाज अनीश भानवाला, विजयवीर सिद्धू आणि समीरनं रौप्य पदक जिंकून स्पर्धेचा शेवट गोड केलाय. तसेच भारताला पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवण्यास मदत केली. या स्पर्धेत भारतानं 15 पदकं जिंकली आहेत. ज्यात 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. दक्षिण कोरियाला शेवटच्या दिवशी फक्त एक कांस्य पदक जिंकता आलं. दक्षिण कोरियानं या स्पर्धेत चार सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह त्यांच्या मोहिमेचा शेवट केला.


भारतीय त्रिकुटानं पात्रतेच्या दोन फेऱ्यांनंतर अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पहिल्या फेरीत भारत 872 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला.त्यानंतर दुसऱ्या फेरीत 578 गुणांसह अव्वल स्थान मिळवलं.चांगवॉन आंतरराष्ट्रीय नेमबाजी श्रेणीतील अंतिम फेरीत भारतीय नेमबाजी संघाला चेक रिपब्लिकच्या मार्टिन पोधरास्की, टॉमस तेहान आणि मातेज रामपुला यांच्याविरुद्ध 17-15 असा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघानं सुरुवातीला दमदार कामगिरी करत चेक रिपब्लिकविरुद्ध 10-2 अशी आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर चेक रिपब्लिकच्या त्रिकुटानं भारताला बॅकफटूवर ढकलून जबरदस्त कमबॅक केलं. मिश्र सांघिक स्कीट स्पर्धेत फॉर्मात असलेल्या मैराज अहमद खान आणि झाहरा मुफद्दल दीसावाला यांनी 17 संघांमधून 138/150 गुणांसह नववं स्थान पटकावलं.


नेमबाजी विश्वचषका दुसऱ्यांदा भारत अव्वल
भारतीय यावर्षी दुसऱ्यांदा भारतीय नेमबाजी विश्वचषकातील पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलंय. कैरो येथे पार पडलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतान सर्वाधिक सुवर्णपदक जिंकून मोहिमेचा शेवट केला होता.


भारत पुढच्या स्पर्धेसाठी सज्ज
भारत ऑक्टोबरमध्ये होणार्‍या नेमबाजी विश्वचषकासह कैरो रायफल/पिस्तूल संघाच्या पुढील असाइनमेंटसाठी देखील सज्ज होईल. शॉटगन संघ सप्टेंबरमध्ये क्रोएशियाच्या ओसिजेक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तयार आहे. 


हे देखील वाचा-