IPL Media Rights 2023-27 Auction: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं अर्थात बीसीसीआय (BCCI) आयपीएलच्या पुढील पाच वर्षांसाठीचे मीडिया राइट्ससाठी आज लिलाव प्रक्रिया सुरू केलीय. आज अर्थात 12 जून रोजी 11 वाजण्याच्या सुमारास ही लिलाव प्रक्रिया सुरु झालाय. यंदा या लिलाव प्रक्रियेत बऱ्याच मोठ्या कंपन्या सामिल झाल्या आहेत. यामुळं बीसीसीआयला मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रसारण माध्यमांच्या हक्कासाठी डिज्नी स्टार , सोनी नेटवर्क आणि रिलायन्स व्हिकॉम18 आणि झी यांच्यात जोरदार टक्कर सुरू आहे. आतापर्यंत या लिलावात 42 हजार कोटींपर्यंत बोली लावली गेली आहे. त्यानुसार, प्रतिकोटी 100 कोटी रुपये मोजण्याची तयारी स्पर्धकांनी दर्शवली आहे.


महत्वाचं म्हणजे, प्रसारण हक्काचे वर्गीकरण चार गटांमध्ये करण्यात आले आहेत. हे सामने प्रसारित करण्याची माध्यमं वेगवेगळी असतील. 
पॅकेज ए: भारतीय उपखंड (टिव्ही)- 49 कोटी (प्रत्येक सामन्यासाठी)
पॅकेज बी: भारतीय उपखंड (डिजिटल)-  33 कोटी (प्रत्येक सामन्यासाठी)
पॅकेज सी: प्रत्येक सत्रात 18 निवडक सामन्यांच्या डिजिटल प्रसारणाचे अधिकार, 11 कोटी (प्रत्येक सामन्यासाठी)
पॅकेज डी: भाततीय उपखंडाबाहेरील देशांमध्ये टीव्ही आणि डिजिटल दोन्ही प्रसारणाचे अधिकार (33 कोटी)


कोणत्या कंपन्या लिलावात सामिल?
अॅमेझॉन कंपनीने या लिलाव प्रक्रियेतून माघार घेतल्यानंतर इतर चार बड्या कंपन्यात चुरशीची टक्कर सुरु असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये वायकॉम 18, सोनी, झी आणि स्टार हॉटस्टार या कंपन्या आहे. सध्या हे सर्व हक्क स्टार हॉटस्टार यांच्याकडे असून आपल्याकडीस हे डिजीटल राईट्स कायम ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तर झी, वायकॉम 18, सोनी यांच्यातही याच्यासाठी चुरशीची शर्यत पाहायला मिळत आहे.


याआधी किती रुपयांना विकले गेले होते मीडिया राइट्स? 
आयपीएल मीडिया राइट्ससाठी मागील लिलाव 2017 साली पार पडला होता. त्यावेळी स्टार इंडियाने 2022 पर्यंत साठी मीडिया राइट्स 16 हजार 347.50 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याआधी 2008 मध्ये सोनी पिक्चर्स नेटवर्कने 8 हजार 200 कोटी रुपयांची बोली लावत 10 वर्षांसाठी मीडिया राइट्स मिळवण्यात यश मिळवलं होतं.


हे देखील वाचा-


IND vs SA, 2nd T20 Live Updates: भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स


ENG vs NZ: ट्रेंट बोल्टची मुथय्या मुरलीधरनच्या विश्वविक्रमाशी बरोबरी, बॉल नव्हे तर बॅटनं दाखवली कमाल!


AFC Asian Cup Qualifiers: भारत- अफगाणिस्तान फुटबॉल सामन्यात तुफान राडा, पाहा नेमकं काय घडलं?