India vs Afghanistan in Asian Cup 2023 Qualifiers: भारत- अफगाणिस्तान यांच्यात कोलकाता येथे शनिवारी खेळण्यात आलेल्या एशियन फुटबॉल कपच्या क्वालिफायर सामन्यात दोन्ही देशातील खेळाडूं एकमेकांशी भिडले. भारत- अफगाणिस्तान यांच्यातील तुफान राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  एशियन फुटबॉल कपच्या क्वालिफायर सामन्यात नेमकं काय घडलं? यावर एक नजर टाकुयात. 


नेमकं काय घडलं?
या सामन्यात अखेरच्या काही क्षणात भारतीय फुटबॉलपटूंनी गोल करून सामना जिंकला. भारताचा विजय अफगाणिस्तानच्या खेळाडूंना खटकला. त्यानंतर फ्रस्टेशनमध्ये आलेल्या आफगाणिस्तानच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंशी वाद घालायला सुरुवात केली. हा वाद इतका पेटला की, दोन्ही देशातील खेळाडू ऐकमेकांच्या अंगावर धावून गेले. एवढेच नव्हेतर बेंचवर बसलेले खेळाडूही मैदानात दाखल झाले. सुरुवातीला काहीच खेळाडूंमध्ये वाद पाहायला मिळाला. 


रोमांचक सामन्यात भारताचा विजय
भारत- अफगाणिस्तान यांच्यातील रोमांकच ठरला. दोन्ही संघात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. सामन्याच्या 84 मिनिटापर्यंत दोन्ही संघाला एकही गोल करता आला नव्हता. परंतु, 85 व्या मिनिटात भारताच स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी केवळ तीन मिनिटे टिकली आणि अफगाणिस्तानचा खेळाडू झुबेर अमिरीनं 88व्या मिनिटाला हेडर करत सामना बरोबरीत आणला. भारताच्या अब्दुल समदनं इंजुरी टाइममध्ये (90 + 2) शानदार गोल करून भारताला विजय मिळवून दिला.


व्हिडिओ-



ग्रुप डीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर 
एशियन कप 2022 च्या फायनल क्वालिफाईंग राऊंडच्या ग्रुप डीमध्ये भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, हाँगकाँगचा संघ पहिल्या स्थानावर आहे. 


हे देखील वाचा-