England vs New Zealand: इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ)  यांच्यात नॉटिंगहॅम येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव 553 धावांवर आटोपला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडनं 1 विकेट्स गमावून 90 धावा केल्या. न्यूझीलंड सध्या इंग्लंडपेक्षा 463 धावांनी पुढं आहे. न्यूझीलंडच्या डावात डॅरिल मिशेलनं शानदार 190 धावांची खेळी केली, तर टॉम ब्लंडेलनं 106 धावा केल्या. सामन्याच्या अखिरेस वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनं (Trent Boult) 18 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीनं 16 धावा करत श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या (Muttiah Muralitharan) विश्वविक्रमाशी बरोबरी केलीय. 

कसोटी क्रिकेटच्या इतिहास अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मुरलीधरन यांच्या नावावर आहे. मुरलीधरननं आपल्या कसोटी कारकिर्दीत एकराव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 623 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहॅम कसोटी सामन्यात ट्रेंट बोल्टनं मुरलीधरनच्या या विक्रमाशी बरोबरी केलीय. तसेच मुरलीधरनचा विश्वविक्रम मोडण्यासाठी त्याला केवळ एका धावाची आवश्यकता आहे. यामुळं लवकरच ट्रेंट बोल्ट मुरलीधरनचा विक्रम मोडेल, अशी अपेक्षा केली जातेय.

11व्या क्रमांकावर कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू- 

क्रमांक फलंदाजांचं नाव धावा
1 ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) 623
2 मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) 623
3 जेम्स अँडरसन (इंग्लंड) 609
4 ग्लेन मॅकग्रॉ (ऑस्ट्रेलिया) 603
5 कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज) 553

मुरलीधरनला मागं टाकण्याची संधी
ट्रेंट बोल्टनं 11व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात येऊन आतापर्यंत 623 धावा केल्या आहेत. बोल्टनं 69 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. तर, मुरलीधरननं हा आकडा गाठण्यासाठी 87 कसोटी सामने खेळले आहेत. या यादीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज  जेम्स अँडरसननं तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 609 धावा केल्या आहेत. त्यानंतर 603 धावांसह ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा चौथ्या आणि वेस्ट इंडीजचा कोर्टनी वॉल्श 553 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. 

हे देखील वाचा-