एक्स्प्लोर

IPL 2026 Points Table: मुंबई इंडियन्सचा एका विजयाने सगळं चित्र बदललं; आयपीएलच्या Points Table मध्ये उलथापालथ

IPL 2026 Points Table: मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल 2026 च्या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. मुंबईच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलटफेर झाली आहे.

IPL 2026 Points Table: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने एकतर्फी विजय मिळवला. मुंबईने गुजरातला तब्बल 99 धावांनी पराभूत केले. मुंबईच्या तिलक वर्मा (Tilak Verma) याला सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला. तिलक वर्माने 45 चेंडूत 101 धावा केल्या. (Gujarat Titans vs Mumbai Indians)

मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल 2026 च्या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. मुंबईच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलटफेर झाली आहे. मुंबई गुणतालिकेत अगदी तळाशी 10 व्या स्थानावर होती. गुजरातविरुद्धच्या विजयानंतर मुंबई आता थेट सातव्या स्थानावर पोहोचली आहे. मुंबईने सहा सामन्यात दोन विजय मिळवले असून 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचे सध्या 4 गुण आहेत. विशेष म्हणजे, या मोठ्या विजयामुळे मुंबईला 'नेट रन रेट'च्या बाबतीतही लक्षणीय फायदा झाला आहे.

गुजरात टायटन्स सहाव्या स्थानावर- (Mumbai Indians vs Gujarat Titans)

पराभव होऊनही, गुजरातने आपले 6 वे स्थान कायम राखले आहे. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघ मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वीही याच स्थानावर होता. गुजरातने सहा सामने खेळले असून, त्यापैकी तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. परिणामी, संघाकडे सध्या 6 गुण आणि -0.821 असा नेट रनरेट आहे.

पंजाब किंग्स अव्वल स्थानावर- (IPL 2026 Points Table)

गुणतालिकेत सध्या पंजाब किंग्स पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्यापाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या, राजस्थान रॉयल्स तिसऱ्या आणि सनरायझर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर आहेत. या अव्वल चार संघांचे गुण अनुक्रमे 11, 08, 08 आणि 06 असे आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स पाचव्या स्थानावर, गुजरात सहाव्या, मुंबई सातव्या, चेन्नई आठव्या, लखनौ नवव्या आणि केकेआर दहाव्या स्थानावर आहे.

आज हैदराबाद आणि दिल्लीत सामना- (SRH vs DC)

सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात आज सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यातही आपल्या विजयाची मालिका कायम राखण्याचा हैदराबादचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघही दमदार कामगिरी करण्याचे उद्दिष्टाने मैदानात उतरेल.

संबंधित बातमी:

GT Vs MI IPL 2026 : शेवटी मुंबईचा स्वाभिमान जागा झाला! विजयासाठी आसुसलेल्या 'पलटण'ला तिलक वर्माने दिले बळ; बालेकिल्ल्यात गुजरातचा धुव्वा

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
IND vs SL : सिराज, कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी, चारपैकी कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग XI मध्ये संधी? अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा सल्ला
श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी? अजिंक्य रहाणेनं दोघांची नाव सांगितली
Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget