IPL 2026 Points Table : गुजरातचा IPL मधील गेमचेंजर विजय! RCB-CSKला भरली धडकी, राजस्थानला प्लेऑफच्या दारातून बाहेर फेकलं, 5 पॉइंटमध्ये समजून घ्या गेम
IPL 2026 Points Table Update In Marathi : आयपीएल 2026 मध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा तब्बल 77 धावांनी धुव्वा उडवत पॉइंट्स टेबलचं संपूर्ण चित्रच बदलून टाकलं आहे.

IPL 2026 Points Table Update In Marathi : आयपीएल 2026 मध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा तब्बल 77 धावांनी धुव्वा उडवत पॉइंट्स टेबलचं संपूर्ण चित्रच बदलून टाकलं आहे. या एका निकालाने प्लेऑफच्या शर्यतीत जबरदस्त खळबळ उडाली असून अनेक संघांचं गणित कोलमडलं आहे. सामना सुरू होण्यापूर्वी पाचव्या स्थानावर असलेली गुजरातची टीम आता थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. दुसरीकडे, संपूर्ण हंगामात दबदबा राखणाऱ्या राजस्थानला मोठा धक्का बसला आहे.
गुजरातला मोठा फायदा
गुजरात टायटन्ससाठी हा विजय संजीवनीसारखा ठरला. 11 सामन्यांत 7 विजय आणि 4 पराभवांसह गुजरातच्या खात्यात आता 14 गुण जमा झाले आहेत. विशेष म्हणजे अव्वल स्थानावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादचेही 14 गुणच आहेत, मात्र नेट रनरेट (+0.737) मुळे हैदराबाद अजूनही पहिल्या स्थानावर कायम आहे. गुजरातचा नेट रनरेट आता +0.228 वर पोहोचला असून त्यामुळे त्यांना टॉप-2 मध्ये मोठा फायदा झाला आहे.
राजस्थान रॉयल्सला जबर धक्का
राजस्थान रॉयल्ससाठी हा पराभव एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला. यंदाच्या हंगामात प्रथमच राजस्थानची टीम टॉप-4 मधून बाहेर फेकली गेली आहे. 11 सामन्यांत 6 विजय आणि 5 पराभवांसह राजस्थानचे 12 गुण आहेत. मात्र मोठ्या फरकाने पराभव झाल्याने त्यांचा नेट रनरेट घसरून +0.082 वर आला आणि त्यामुळे ते थेट पाचव्या स्थानावर घसरले. आता प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी राजस्थानला उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.
RCB आणि पंजाबला मोठा धक्का
या मोठ्या उलथापालथीचा फायदा पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला झाला आहे. पंजाब 10 सामन्यांत 13 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून त्यांची स्थिती सध्या मजबूत दिसत आहे. तर आरसीबी 10 सामन्यांत 12 गुण आणि जबरदस्त नेट रनरेट (+1.234) मुळे चौथ्या स्थानावर कायम आहे. राजस्थानच्या पराभवानंतर या दोन्ही संघांचा टॉप-4 चा मार्ग आणखी सोपा झाला आहे.
चेन्नई आणि कोलकात्याचं टेन्शन वाढलं
पॉइंट्स टेबलच्या खालच्या भागात चेन्नई सुपर किंग्स 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे, तर कोलकाता नाईट रायडर्स 9 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. गुजरातच्या या मोठ्या विजयामुळे या दोन्ही संघांसाठी प्लेऑफचं दार आणखी अरुंद झालं आहे. आता सीएसके आणि केकेआरला उर्वरित सामने सलग जिंकण्यासोबतच इतर संघांच्या पराभवाचीही आशा ठेवावी लागणार आहे.
तळाच्या संघांची अवस्था बिकट
दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांची परिस्थिती आता अत्यंत कठीण झाली आहे. दिल्लीकडे 11 सामन्यांत फक्त 8 गुण आहेत, तर मुंबई आणि लखनऊच्या खात्यात प्रत्येकी 6 गुण आहेत. गणितीयदृष्ट्या हे संघ अजूनही स्पर्धेत असले तरी प्रत्यक्षात प्लेऑफमध्ये पोहोचणं आता जवळपास अशक्य मानलं जात आहे.
हे ही वाचा -




















