एक्स्प्लोर

Broadcast Engineer Passes Away : मुंबई इंडियन्सच्या सामन्यानंतर हॉटेलवर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला; ब्रॉडकास्ट इंजिनिअरच्या निधनानंतर BCCIची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?

IPL 2026 Broadcast Engineer Passes Away : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अनुभवी ब्रॉडकास्ट इंजिनिअर इयन विल्यम लँगफोर्ड (Ian Williams Langford) यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

IPL 2026 Broadcast Engineer Passes Away : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अनुभवी ब्रॉडकास्ट इंजिनिअर इयन विल्यम लँगफोर्ड (Ian Williams Langford) यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. लँगफोर्ड हे आयपीएलच्या ब्रॉडकास्ट टीमचा महत्त्वाचा भाग होते. 30 मार्च रोजी सकाळी ते मुंबईतील हॉटेलच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ब्रॉडकास्ट इंजिनिअरचं निधन, बीसीसीआयने काय म्हटलं? (BCCI Statement Broadcast Engineer Passes Away)

बीसीसीआयने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि सर्व संबंधित घटक समर्पित ब्रॉडकास्ट इंजिनिअर इयन विल्यम लँगफोर्ड यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करतात. ते आमच्या ब्रॉडकास्ट ऑपरेशन्सचा अविभाज्य भाग होते. त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराप्रती आमच्या संवेदना व्यक्त करतो."

पडद्यामागे काम करणाऱ्या सहकाऱ्यांप्रती आपली बांधिलकी अधोरेखित करत बीसीसीआयने पुढे म्हटले आहे की, "या कठीण काळात लँगफोर्ड यांच्या कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत देण्यास आयपीएल कटिबद्ध आहे. स्पर्धेच्या सुरळीत आयोजनासाठी काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याचे आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याण ही आमची सर्वोच्च प्राधान्ये आहेत."

नेमकं काय घडलं? (BCCI brand cast engineer death)

76 वर्षीय ब्रिटिश नागरिक लँगफोर्ड आयपीएलच्या ब्रॉडकास्ट कामासाठी मुंबईत आले होते. ते 24 मार्चपासून ट्रायडेंट हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. 29 मार्चच्या रात्री सामना संपल्यानंतर ते आपल्या खोलीत परतले होते. मरीन ड्राइव्ह पोलिसांच्या माहितीनुसार, 30 मार्चच्या सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत पाहिले. हॉटेल व्यवस्थापनाने तातडीने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु तेथे पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अजून तरी संशयास्पद बाब आढळलेली नाही... (IPL 2026 Broadcast Engineer Passes Away )

प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालातही काहीही संशयास्पद निष्पन्न झालेले नाही. तरीही, खबरदारी म्हणून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, 28 मार्चपासून आयपीएल 2026 हंगामाची सुरुवात झाली असून आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत. मंगळवारी पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात न्यू चंदीगड स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे.

हे ही वाचा -

Shaheen Afridi PSL Controversy : मध्यरात्री पाकिस्तानच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये काय घडलं? शाहीन आफ्रिदीवर PCBची मोठी कारवाई, ठोठावला इतक्या लाखांचा दंड

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Netherlands Captain News : वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
Embed widget