IND Vs WI T-20 Series: वेस्ट इंडीजविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्डेडिअमवर खेळण्यात आलेल्या एकदिवसीय मालिकेत भारतानं 3-0 असा विजय मिळवलाय. यानंतर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्याची टी-20 मालिका रंगणार आहे. टी-20 मालिकेला येत्या 16 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघ कोलकात्यात दाखल झालाय. बीसीसीआयनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडवरून ही माहिती दिलीय. एकदिवसीय मालिकेनंतर टी-20 मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतोय? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
भारतीय संघ कोलकात्याला पोहचल्यानंतर बीसीसीआयनं खेळाडूंचा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत भारतीय खेळाडूंचा अहमदाबाद ते कोलकातापर्यंतचा प्रवास थोडक्यात दाखवण्यात आलाय. या व्हिडिओला मोठी पसंती दर्शवली जात आहे. तसेच या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यावर अनेक वापरकर्त्यांनी रिट्वीटही केलंय.
बीसीसीआयचं ट्वीट-
भारतविरुद्ध वेस्ट इंडीज टी-20 मालिका वेळापत्रक
पहिला टी-20 सामना- 16 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)
दुसरा टी-20 सामना- 18 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)
तिसरा टी-20 सामना- 20 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)
भारतानं एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. भारतानं 3 एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत वेस्ट इंडीजच्या संघाला 3-0 च्या फरकानं पराभूत केलंय. वेस्ट इंडीजच्या संघाकडून जेसन होल्डरनं चांगली खेळी केल. ज्यामुळं आयपीएल फ्रँचायझीं लखनौ सुपर जायंट्सनं खरेदी केलंय. होल्डरची मूळ किंमत 1.50 कोटी इतकी होती. परंतु, ऑक्शनदरम्यान लखनौच्या संघानं त्याला 8.75 कोटीत विकत घेतलंय.
हे देखील वाचा-
- IPL 2022, Mega Auction : 551 कोटी, 204 खेळाडू आणि 10 संघ... आयपीएल मेगा ऑक्शनच्या हायलाइट्स
- IPL Auction 2022: हार्दीकच्या टोळीत हे आहेत महारथी, असा आहे गुजरात टायटन्सचा संघ
- Lucknow Super Giants Final Squad 2022: केएल राहुलसारखा कर्णधार, तर अष्टपैलूंचा भरणा, लखनौचा संघ पाहिलात का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha