Players Retirement In T20 World Cup 2024: भारतीय संघाने 2 जून रोजी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी नमवून दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) उंचावला. विराट कोहली, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी भारतासाठी निर्णायक कामगिरी केली. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांत कोणत्याही एका खेळाडूवर विसंबून नसल्याचे दाखवून दिले. विराट कोहलीला सामनावीर तर जसप्रीत बुमराह मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आला.


टी-20 विश्वचषक जिंकल्याचा भारताला आनंद आहे. मात्र रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर केल्याने चाहते निराश देखील झाले. मात्र तुम्हाला माहितीय का टी-20 विश्वचषक सुरु असताना आणखी काही खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली होती. 


विराट कोहली (Virat Kohli)-


भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2024 चं जेतेपद जिंकल्यानंतर विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा केली. यावेळी विराट कोहलीने सांगितले की, हा माझा शेवटचा टी-20 विश्वचषक आणि भारताकडून शेवटचा टी-20 सामना होता. विराट कोहली वन-डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल. 


रोहित शर्मा (Rohit Sharma)-


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं. यांनतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केली. रोहित शर्मा आयपीएल, वन-डे आणि कसोटी क्रिकेट खेळताना दिसेल. 


रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)-


विराट कोहली आणि रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने देखील आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्तीची घोषणा केली. वन-डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा खेळताना दिसेल. 


डेव्हिड वॉर्नर (David Warner)-


ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आधीच कसोटी क्रिकेट आणि वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेतून ऑस्ट्रेलियाचा संघ बाहेर पडल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. 


ट्रेंट बोल्ट (Trent Boult)-


न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने देखील शेवटचा टी-20 विश्वचषक खेळला. विश्वचषकादरम्यान ट्रेंट बोल्टने निवृत्तीबाबत याआधीच कल्पना दिली होती. 


आयसीसीकडूनही बक्षीस जाहीर-


जेतेपद पटकवल्यानंतर भारतीय संघाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले. भारतीय संघासोबतच दक्षिण आफ्रिकेलाही बक्षीस मिळाले आहे. टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी एकूण बक्षीस रक्कम 11.25 दशलक्ष डॉलर्स (93.51 कोटी) ठेवण्यात आले  होते. जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला 20.36 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. तर दक्षिण आफ्रिकेने  1.28 मिलियन डॉलर्स म्हणजेच 10.64 कोटी कमावले. 


उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघांनाही मोठं बक्षीस


टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका सोबतच आणखी दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचले होते. इंग्लंड आणि अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र, या दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंड आणि अफगाणिस्तानला बक्षीस म्हणून 6.54 कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय इतर संघांनाही बक्षीस मिळाले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पोहोचलेल्या प्रत्येक संघाला म्हणजेच सुपर 8 ला 3.17 कोटी रुपये मिळाले आहेत.


संबंधित बातम्या:


Ritika Sajdeh Post For Rohit Sharma: 'मला खूप वाईट वाटलं...'; रोहित शर्माच्या निवृत्तीने पत्नी रितिका भावूक, पोस्टद्वारे सर्व बोलली


T20 World Cup 2024: जिंकला, हसला, रडला, तिरंगा रोवला; विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे अंगावर काटा आणणारे टॉप 15 फोटो