Indian Cricket Team Updates: टी-20 विश्वचषक 2024 ची (T20 World Cup 2024) स्पर्धा जिंकून टीम इंडिया (Indian Cricket Team) आज मायदेशी परतली आहे. सकाळी 6 वाजता टीम इंडियाचं विशेष विमान दिल्लीत दाखल झालं. 29 जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने तब्बल 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघ आज (4 जुलै) भारतात परतला आहे. यावेळी टीम इंडियाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. 


टीम इंडिया सध्या दिल्लीतील आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये आहे. त्यानंतर भारतीय खेळाडू साधारण 11च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला जातील. त्यानंतर दुपारी 2 ते 3च्या सुमारास टीम इंडिया मुंबईत दाखल होईल. मुंबईत टीम इंडियाची विजयी यात्रा काढण्यात येणार आहे. टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवरही जाईल. याठिकाणी भारतीय संघाच्या स्वागतासाठी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. टीम इंडियाची मुंबईतील विजयी रॅली मोबाईलवर पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्सवर सायंकाळी 4 वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स 1, हिंदी 1, 3 आणि त्यांच्या YouTube चॅनेलवर प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे जे चाहते मुंबईत पोहचू शकणार नाही, त्यांना आता टीव्ही आणि मोबाईलद्वारे या विजयी रॅलीचा आनंद घेता येणार आहे.






वानखेडे स्टेडियमवर होणार सन्मान-


भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे विशेष स्थान आहे. याच स्टेडियमवर भारताने 2011 सालचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक उंचावला होता. आता, याच स्टेडियमवर आज भारताच्या टी-20 विश्वविजेत्या संघाचाही सन्मान होणार आहे.


रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवचा गणपती डान्स-


टीम इंडिया विमानतळावरून हॉटेलमध्ये पोहोचली आहे. टीम हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच अनेक चाहते तिथे उपस्थित होते. हॉटेलच्या गेटवर चाहत्यांनी रोहित शर्मासह सर्व खेळाडूंचा स्वागत केले. यावेळी बस हॉटेल बाहेर पोहताच सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल यांनी डान्स केला. यावेळी सूर्यकुमार मुंबईकर असल्याने त्याने मुंबई स्टाईल गणपती डान्स केल्याची प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 






संबंधित बातम्या:


टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती


गळ्यात विजयी मेडल...विराट कोहलीने दिल्ली विमानतळाबाहेर येताच काय केलं?; पाहा Video


हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमंक काय घडलं?