टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Indian Cricket Team Updates: टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा जिंकून भारतीय क्रिकेट संघ आज मायदेशी परतला आहे.

team_india_latest_updates_marathi
1/20
टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा जिंकून भारतीय क्रिकेट संघ आज मायदेशी परतला.
2/20
रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराहसह सर्व खेळाडू सकाळी 6 वाजता दिल्ली विमानतळावर दाखल झाले.
3/20
दिल्ली विमानतळावर दाखल होताच सर्व खेळाडू खूप उत्साहित होते. सर्व खेळाडूंच्या गळ्यात विजयी मेडल पाहायला मिळाले.
4/20
टीम इंडियाला घेण्यासाठी विमानतळावर दोन बस दाखल झाल्या होत्या.
5/20
दिल्ली विमानतळाबाहेर यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला.
6/20
जसप्रीत बुमराहचे चाहत्यांनी स्वागत केले.
7/20
विमानतळाबाहेर उपस्थित असणाऱ्या चाहत्यांचे विराट कोहलीने हात दाखवत आभार मानले.
8/20
यावेळी कोहली-कोहली अशा घोषणा चाहत्यांकडून देण्यात आल्या.
9/20
सूर्यकुमार यादवचे देखील चाहत्यांनी जोरदार स्वागत केले.
10/20
सूर्यकुमार यादवने देखील चाहत्यांचे यावेळी आभार मानले.
11/20
कर्णधार रोहित शर्मा विमानतळाबाहेर येताच विश्वचषक ट्रॉफी उंचावताना दिसला.
12/20
ट्रॉफी उंचावत रोहित शर्माने चाहत्यांचे आभार मानले.
13/20
रोहत शर्मा बाहेर येताच रोहित-रोहित अशा घोषणा चाहते देताना दिसले.
14/20
टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
15/20
यानंतर विमानतळाहून दिल्लीतील हॉटेलला जाण्यासाठी टीम इंडियाची बस रवाना झाली.
16/20
आज टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे.
17/20
यानंतर टीम इंडिया दुसऱ्या चार्टर्ड फ्लाइटने मुंबईला रवाना होईल.
18/20
मुंबईत संध्याकाळी 5 च्या सुमारास विश्वविजेत्यांचा शानदार रोड शो होईल.
19/20
भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे विशेष स्थान आहे. याच स्टेडियमवर भारताने 2011 सालचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक उंचावला होता.
20/20
आता, याच स्टेडियमवर गुरुवारी भारताच्या टी-२० विश्वविजेत्या संघाचाही सन्मान होणार आहे.
Published at : 04 Jul 2024 07:59 AM (IST)