30 वर्ष अन् 6 कर्णधार...दक्षिण आफ्रिकामध्ये भारतीय संघ फ्लॉप, कसोटी मालिका जिंकण्यात अपयश
India In South Africa Test Series: विराट कोहलीच्या नेतृत्वात 2018 मध्येही भारतीय संघाचा पराभव झाला होता. 2018 मध्येही दक्षिण आफ्रिका संघाने 2-1 ने मालिका जिंकली होती.
India Never Win Test Series In South Africa : केपटाऊन येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाला समोरं जावे लागले. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा सात गड्यांनी पराभव केला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकामध्ये पहिला कसोटी मालिका विजय मिळवण्यास भारतीय संघाला अपयश आले आहे. 1992 पासून आजतागत दक्षिण आफ्रिकामध्ये भारतीय संघाला एकही विजय मिळवता आलेला नाही. मोहम्मद अज़हरुद्दीनपासून ते विराट कोहलीपर्यंत मागील 30 वर्षांत दक्षिण आफ्रिकामध्ये भारतीय संघाला एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.
असा झाला पराभव -
तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघासमोर 212 धावांचे आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिका संघाने हे आव्हान तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. यासह दक्षिण आफ्रिका संघाने तीन सामन्याची कसोटी मालिका 2-1 ने जिंकली. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवत दक्षिण आफ्रिका संघाने मालिका जिंकली.
2018 मध्येही विराट सेनेचा झाला होता पराभव -
विराट कोहलीच्या नेतृत्वात 2018 मध्येही भारतीय संघाचा पराभव झाला होता. 2018 मध्येही दक्षिण आफ्रिका संघाने 2-1 ने मालिका जिंकली होती.
2014 मध्ये धोनीच्या नेतृत्वातही पराभव -
2013-14 मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारतीय संघाचा 0-1 असा पराभव झाला होता.
2010 मध्ये बरोबरी -
2010-11 वर्षात भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. या दौऱ्यात भारतीय संघाचा पराभव झाला नव्हता पण मालिकाही जिंकता आलेली नव्हती. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने मालिका बरोबरीत राखली होती. दक्षिण आफ्रिकामधील भारताचे हे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे.
राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पराभव
राहुल द्रविडच्या नेतृत्वात 2006-07 मध्ये भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकामध्ये 1-2 ने पराभव झाला होता. 2001-02 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वातही भारतीय संघाला 0-1 असा पराभव स्विकारावा लागला होता. याआधी 1996-97 मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात भारतीय संघाने 0-2 ने कसोटी मालिका गमावली होती.
1992 मध्ये मिळाला पराभव -
मोहम्मद अज़हरुद्दीनच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिला दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. 1992-93 मध्ये दक्षिण अफ्रीका दौऱ्यावर भारतीय संघाला चार सामन्याच्या मालिकेत 0-1 पराभव झाला होता. मागील तीस वर्षात एकाही कर्णधाराला दक्षिण आफ्रिकामध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. सहा कर्णधारांना अपयश आले आहे. यामध्ये धोनीचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे.