टीम इंडियाच्या फलंदाजी-गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदासाठी दोन दिग्गजांना गौतम गंभीरचा फोन; पहिलं प्राधान्य कोणाला?
Indian Cricket Team Coach: राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात आली आहे.
Indian Cricket Team Coach: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरला (Gautam Gambhir) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक (Indian Cricket Team Head Coach) म्हणून निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपदावरुन राहुल द्रविड टी-20 विश्वचषकानंतर संपल्यानंतर निवृत्त झाले. राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात आली आहे.
गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर आता टीम इंडियाच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान गौतम गंभीरने अभिषेक नायरला टीम इंडियाचा बॅटिंग कोच आणि विनय कुमारला बॉलिंग कोच बनवण्याची मागणी केल्याचे म्हटले आहे. फलंदाजी प्रशिक्षकासाठी अभिषेक नायर आणि गोलंदाजी प्रशिक्षकासाठी वेगवान गोलंदाज विनय कुमार यांना फोन केल्याचं सांगण्यात येत आहे.
Abhishek Nayar as batting coach & Vinay Kumar as bowling coach for Indian team has been asked by Gautam Gambhir. [RevSportz] pic.twitter.com/cllDZHryZW
— Johns. (@CricCrazyJohns) July 9, 2024
कोण आहे अभिषेक नायर?
अभिषेक नायर हा माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. त्याने भारतासाठी तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने 60 आयपीएल सामने खेळले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि आता त्यांची त्रिनबागो नाईट रायडर्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विनय कुमार कोण आहे?
विनय कुमार हा देखील माजी भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आहे. त्याने भारतासाठी 41 आंतरराष्ट्रीय आणि 105 आयपीएल सामने खेळले आहेत. विनय कुमार यूएई क्रिकेट लीगच्या आयएलटी-20 मध्ये MI Emirates चा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. यासह, तो आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट स्काउटचा देखील एक भाग आहे.
गौतम गंभीरचा कार्यकाळ किती ?
राहुल द्रविडनं आयसीसी वनडे विश्वचषकानंतर मुख्य प्रशिक्षक पद सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रोहित शर्माच्या विनंतीनंतर त्यानं टी-20 विश्वचषकपर्यंत पदावर कायम राहण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयनं राहुल द्रविडला 2027 च्या वनडे विश्वचषकापर्यंत पदावर राहण्याची विनंती केली होती. मात्र, राहुल द्रविडनं नकार दिल्यानंतर नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु झाला होता. भारताच्या टी-20 आणि वनडे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या गौतम गंभीरला भारताचं मुख्य प्रशिक्षक पद सोपवण्यात आलं आहे.