(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फायनलआधी रोहित शर्माची हुंकार, प्लेईंग 11 वरही केले भाष्य, काय म्हणाला हिटमॅन?
Rohit Sharma PC Before IND vs AUS Final : आतापर्यंत सर्व चांगले झालेय, उद्याही चांगलेच होईल, असा विश्वास रोहित शर्माने व्यक्त केला.
Rohit Sharma PC Before IND vs AUS Final : आतापर्यंत सर्व चांगले झालेय, उद्याही चांगलेच होईल, असा विश्वास रोहित शर्माने व्यक्त केला. अहमदाबादमध्ये होणाऱ्या मेगाफायनलपूर्वी रोहित शर्माने पत्रकार परिषदेत विविध विषयावर भाष्य केले. ऑस्ट्रेलियाने सलग आठ सामन्यात विजय मिळवला, त्याबाबत फारसं काही वाटत नाही, असे रोहित शर्मा म्हणाला. विश्वचषकाची मागील दोन वर्षांपासून तयारी करत असल्याचेही रोहितने सांगितले.
ऑस्ट्रेलियाचा संघ प्रभावी कामगिरी करतोय, त्याची आम्हाला काहीच अडचण नाही. त्यांनी मागील आठ सामने जिंकले. फायनलचा सामना रंगतदार होईल. दोन्ही संघ तुल्यबळ आहे. विश्वचषकाची फायनल खेळणं, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे. 50 षटकांचा विश्वचषकात पाहतच मी लहानाचा मोठा झालेय, असेही रोहित म्हणाला.
फायनलसाठी महत्वाचं काय आहे? यावर लक्ष द्यायला हवं. त्यासाठी खूप वेळ दिलाय.. अन् लक्ष केंद्रीत केलेय. आतापर्यंत जी तयारी केली, त्यावरच कायम राहायला हवे. पहिल्या सामन्यापासूनच आम्ही त्यावर लक्ष केंद्रीत केलेय. फायनलमध्येही तसेच करु... भारतीय क्रिकेटर म्हणून नक्कीच दबाव असेल. खेळाडू म्हटले की, कौतुक टीका अन् दबाव या गोष्टी येतातच, असे रोहित शर्मा म्हणाला.
🎙️ #TeamIndia Captain Rohit Sharma addressing the pre-match press conference ahead of the #CWC23 Final 🏟️#MenInBlue | #INDvAUS pic.twitter.com/7SgUX0ws9q
— BCCI (@BCCI) November 18, 2023
प्लेईंग 11 वर काय म्हणाला
फायनलसाठी प्लेईंग 11 कशी असेल... यावर बोलताना रोहित शर्माने नेहमीप्रमाणेच उत्तर दिले. तो म्हणाला की, सर्व 15 खेळाडूंकडे खेळण्याची संधी आहे. आज आणि उद्या खेळपट्टी पाहिल्यानंतर 12-13 खेळाडू निवडले जातील. पण प्लेईंग 11 अद्याप तयार नाही. सर्व 15 खेळाडू सामन्यासाठी तयार असावेत.
खेळपट्टीबद्दल काय म्हणाला
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर बोलातान रोहित शर्मा म्हणाला की.... भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या खेळपट्टीवर गवत नव्हते. पण फायनलसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर थोड्याफार प्रमाणात गवत आहे. मी अद्याप खेळपट्टी पाहिलेली नाही. पण खेळपट्टी संथ असण्याची शक्यता आहे. उद्या खेळपट्टी पाहिल्यानंतर सर्व निर्णय घेतला जाईल. खेळाडूंना याबाबत कल्पना आहे.
नाणेफेकीवर काय म्हणाला ?
फायनलसाठी नाणेफेक महत्वाची ठरणार नाही.. परिस्थितीनुसार आम्ही चांगले क्रिकेट खेळू
India and Australia are brimming with bowlers who could influence the #CWC23 finale at any point 🔥
— ICC (@ICC) November 18, 2023
The five epic duels that could swing the epic showdown 👉 https://t.co/jB1RlZImt1 pic.twitter.com/VaShEza5kk