ICC Womens Cricketer of the Year: आयसीसीने 2021 या वर्षभरात झालेल्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांनुसार विविध प्रकारातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताला केवळ एकच पुरस्कार मिळाला आहे. भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हीला आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर (ICC Womens Cricketer of the Year) होण्याचा मान मिळाला आहे. 



स्मृतीने मागील वर्षभरात एकूण 22 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात 38.86 च्या सरासरीने धावा करत तिने एक शतक आणि पाच अर्धशतकंही लगावली. तिने एकूण 855 धावा केल्या आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आठ सामने खेळले. ज्यातील केवळ दोन सामने भारत जिंकला ज्यामध्येही मंधानानेच अप्रतिम कामगिरी केली होती. तिने नाबाद 80 आणि नाबाद 48 धावा केल्या होत्या. स्मृतीने आतापर्यंतच्या कारकिर्दीत तिन्ही प्रकारच्या फॉर्मेटमध्ये अप्रतिम खेळ दाखवला आहे.


 





पाकिस्तानचा शाहीन आयसीसी पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर


भारताच्या स्मृतीने महिला क्रिकेटर ऑफ द इयर होण्याचा सन्मान मिळवला असून पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी ठरला आहे. शाहीनने वर्षभरात तिन्ही क्रिकेट प्रकारात उत्कृष्ट गोलंदाजी केली. टी20 विश्वचषकाततर त्याने भारतीय फलंदाजाना अक्षरश: पछाडून सोडले होते.


 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha