Emerging Women Cricketer 2021: आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात ICC ने 2021 वर्षांतील सर्वोत्कृष्ट खेळ करणाऱ्या क्रिकेटपटूंची नावं जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये विविध प्रकारात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) आयसीसी टी20 प्लेयर ऑफ इयर (ICC T20 Player Of Year) पुरस्कार मिळवला असून पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू फातिमा सना (Fatima Sana) हीला 'आयसीसी इमर्जिंग वूमन क्रिकेटर 2021' ने सन्मानित करण्यात आलं आहे.



सनाने यंदा 16 आंतरराष्ट्रीय सामन्यात 23.95 च्या सरासरीने 24 विकेट्स घेतल्या असून 16.50 च्या सरासरीने 165 धावा देखील केल्या आहेत. तिच्या या अष्टपैलू खेळीमुळे तिचा हा सन्मान करण्यात आला आहे. शिवाय ती केवळ 20 वर्षांची असताना तिने ही अप्रतिम कामिगिरी केली आहे. त्यामुळे 2021 या वर्षभरात तिची कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे.


सनाने केलेली ही कामगिरी मर्यादीत षटकांच्या सामन्यांत केलेली आहे. ज्यात बांग्लादेश, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका अशा देशांविरुद्ध खेळलेल्या टी 20 आणि एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. सनाने 24 पैकी 18 विकेट्स या 11 सामन्यात घेतल्या आहेत. तसंच नंबर आठवर फलंदाजीला येऊन तिने नाबाद 28, नाबाद 22 आणि नाबाद 17 धावा केल्या आहेत.