India vs South Africa, 3rd ODI: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. विराटनं टी-20 संघाचा कर्णधारपद सोडल्यानंतर त्यांच्याकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेण्यात आलं. त्यानंतर त्यानं नुकताच कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या आधी देशाचं राष्ट्रगीत (India National Anthem) सुरू असताना विराटनं असं काही कृत्य केलंय, जे पाहून भारतीय क्रिकेट चाहते चांगलेच भडकले आहेत.


प्रत्येक सामन्याआधी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत म्हटले जाते. भारताचे राष्ट्रगीत सुरू असताना विराट कोहलीने जे कृत्य केले त्यावरून चाहते भडकले आहेत. भारताचं राष्ट्रगीत सुरु असताना विराट मान खाली घालून उभा होता. तर, तो राष्ट्रगीतही म्हणता नव्हता आणि च्युइंगम चगळत उभा होता. विराटच्या या कृत्यानं भारतीय चाहते नाराज देखील झाले आहेत. काहींच्या मते हे कृत्य लाजिरवाणं आहे. काही चाहत्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर अनेक जण तीव्र प्रतिक्रिया देखील देत आहेत.


ट्वीट-



ट्वीट-



भारतानं 0-3 फरकानं मालिका गमावली
केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा आणि मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना पार पडला. शेवटच्या ओव्हरपर्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात भारत अवघ्या 4 धावांनी पराभूत झाला. पहिले दोन सामने गमावून भारतानं मालिका गमावलीच होती. परंतु, तिसऱ्या सामन्यातही भारताला पदरात निराशाच पडली. भारतानं 0-3 च्या फरकानं मालिका गमावली आहे. सामन्यात भारताचा युवा खेळाडू दीपक चाहरनं एक अप्रतिम अर्धशतक लगावलं खरं पण संघाला विजय मिळवून देण्यात तो थोडक्यात हुकला.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha