Ind vs Pak T20 World Cup:  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC)नं टी 20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा ही स्पर्था ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात पार पडणार आहे.  यात भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान हे संघ आधीच पात्र ठरले आहेत तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड हे चार संघ 16 ऑक्टोबरपासून पात्र ठरण्यासाठी खेळतील. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर 12 मध्ये खेळण्याची संधी मिळेल.


टीम इंडिया विश्वचषकातील आपल्या अभियानाला 23 ऑक्टोबरपासून सुरुवात करेल. पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध असणार आहे. मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला एकमेकांसमोर असतील. याआधी टी 20 विश्वचषकात भारत पाकिस्तान  2021मध्ये भिडले होते. त्या सामन्यात पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं होतं. 






या तारखांना होतील टीम इंडियाचे सामने


-    भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर (मेलबर्न)
-    भारत विरुद्ध ग्रुप ए रनर-अप, 27 ऑक्टोबर (सिडनी)
-    भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका, 30 ऑक्टोबर (पर्थ)
-    भारत विरुद्ध बांग्लादेश, 2 नोव्हेंबर (एडिलेड)
-    भारत विरुद्ध ग्रुप बी विजेता, 6 नोव्हेंबर  (मेलबर्न)


टीम इंडियाला पाकिस्तान, बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका आणि अन्य दोन क्वालिफायर टीमसह  ग्रुप-2 मध्ये ठेवलं आहे. 


ग्रुप-1: इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान आणि अन्य दोन क्वालिफायर 
ग्रुप-2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि अन्य दोन क्वालिफायर 





13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर फायनल 
T20 विश्वचषकाचे सामने अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात ठिकाणी होणार आहेत. उपांत्य सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी तर विश्वचषकाचा फायनल सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे.