एक्स्प्लोर

India Women vs West Indies Women : 26 चेंडूत खेळ खल्लास, भारताच्या वाघीणींच्या जबड्यात वेस्ट इंडिज गुदमरला, टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये धुव्वा!

मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला अंडर-19 वर्ल्ड कपची भारतीय संघाने सुरुवात धुमधडाक्यात केली आहे.

India Women vs West Indies Women : मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला अंडर-19 वर्ल्ड कपची भारतीय संघाने सुरुवात धुमधडाक्यात केली आहे. ग्रुप अ मध्ये समाविष्ट असलेल्या टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांचा संघ 13.2 षटकांत सर्व विकेट गमावून 44 धावा करू शकला. प्रत्युत्तरात, भारताला लक्ष्याचा पाठलाग करण्यात फारशी अडचण आली नाही आणि त्यांनी केवळ 4.2 षटकांत 1 गडी गमावून 47 धावा करून विजय मिळवला. भारतीय गोलंदाज व्हीजे जोशिता हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

वेस्ट इंडिजला अवघ्या 44 धावांत गुंडाळला!

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीपासूनच हा निर्णय योग्य वाटत होता. कॅरिबियन संघाने पहिल्या पाच षटकांतच तीन विकेट गमावल्या. विकेट पुढे पडत राहिल्या आणि धावसंख्या 26/5 झाली. यादरम्यान, अ‍ॅस्बी कॅलेंडरने 12 धावा केल्या आणि कर्णधार समारा रामनाथने 3 धावा केल्या, तर नजन्नी कंबरबॅच, जहझारा क्लॅक्सटन आणि ब्रायना हरिचरण यांना त्यांचे खातेही उघडता आले नाही. केनिका कैसरने 15 धावा केल्या आणि ती डावात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती. 

इतर कोणालाही काही खास कामगिरी करता आली नाही त्यामुळे वेस्ट इंडिज संघ 50 धावांचा टप्पाही गाठू शकला नाही. वेस्ट इंडिजच्या डावात पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. भारतीय संघाकडून पारुनिका सिसोदियाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. दरम्यान, व्हीजे जोशिता आणि आयुषी शुक्ला यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

टीम इंडियाने सहज गाठले लक्ष्य 

छोट्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला जास्त संघर्ष करावा लागला नाही. पण, सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कारण गोंगाडी त्रिशा 4 धावा करून पहिल्याच षटकात बाद झाली. येथून जी कमलिनी आणि सानिका चालके यांच्या जोडीने पाचव्या षटकातच भारताला लक्ष्य गाठून दिले. कमलिनीने 16 धावांची नाबाद खेळी केली, तर सानिकाने 18* धावा केल्या. वेस्ट इंडिजसाठी एकमेव यश जहझारा क्लॅक्सटनने मिळवले.

हे ही वाचा -

Champions Trophy 2025 : संघात निवड झाली पण मैदानात पाणी देण्याचंच काम? ऋषभ पंत, यशस्वी जैस्वालचा प्लेइंग-11 मधून पत्ता कट?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Embed widget