INDW vs SAW: स्मृती मानधनाच्या शतकानंतर टीम इंडियांची दमदार कामगिरी, दक्षिण आफ्रिकेवर 143 धावांनी दणदणीत विजय
Smirti Mandhana: भारतानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेटवर 265 धावा केल्या होत्या. भारताच्या महिला टीमच्या बॉलिंग पुढं दक्षिण आफ्रिकेचा निभाव लागला नाही. दक्षिण आफ्रिकेचा डाव 122 धावांवर आटोपला.
![INDW vs SAW: स्मृती मानधनाच्या शतकानंतर टीम इंडियांची दमदार कामगिरी, दक्षिण आफ्रिकेवर 143 धावांनी दणदणीत विजय India W vs South Africa W Smriti Mandhana ind beat by 143 runs marathi news INDW vs SAW: स्मृती मानधनाच्या शतकानंतर टीम इंडियांची दमदार कामगिरी, दक्षिण आफ्रिकेवर 143 धावांनी दणदणीत विजय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/8702e1bf7d5c21a53e223eb38c5cee3b1718553434930989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बंगळुरु : भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या (IND W vs SA W) 3 वनडे मॅचेसच्या मालिकेतील पहिली मॅच जिंकली आहे.दक्षिण आफ्रिकेला भारतीय महिला संघानं 143 धावांनी पराभूत केलं आहे. दक्षिण आफ्रिकेला भारतानं विजयासाठी 266 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेटवर 265 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ 37.4 ओव्हरमध्ये 122 धावंवर आटोपला. भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी मॅच 19 जूनला होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग गडगडली
भारतीय महिला संघान पहिल्यांदा फलंदाजी करताना 265 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 266 धावांचं आव्हान होतं. दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. नियमित अंतरानं दक्षिण आफ्रिकेच्या विकेट पडत होत्या. लौरा वूलमार्ट 4 धावा करुन बाद झाली. तिला रेणुका सिंगनं बाद केलं. तजमिन ब्रिटस 18 धावा करुन बाद झाली. अनेके बोस्च्ज 5 धावांवर बाद झाली. सुने लुस 33 धावा करुन दिप्ती शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाली. मेरिजन केपनं 24 धावा केल्या. इतरांना चांगल्या धावा करता आल्या नाहीत. दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध 143 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
भारताकडून कुणी सर्वादिक विकेट घेतल्या?
भारतीय महिला टीमच्या बॉलिंगनं दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला 122 धावांवर गुंडाळलं. आशा शोभना सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरली. तिनं 8.4 ओव्हरमध्ये 21 धावा देत 4 विकेट घेतल्या. दिप्ती शर्मानं 2 विकेट घेतल्या. तर, रेणुका सिंह ठाकूर, पुजा वस्त्राकर आणि राधा यादव यांना एक विकेट मिळाली.
भारताची कॅप्टन हरमप्रीत कौर हिनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाची सुरुवात देखील चांगली झाली नव्हती. मात्र, स्मृती मानधना हिनं 127 बॉलमध्ये 117 धावा करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. यानंतर गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे.
संबंधित बातम्या :
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Smirti Mandhana: मराठमोळ्या स्मृती मानधनानं मैदान गाजवलं, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)