India W Tour Of England: क्रिकेटविश्वात पुन्हा मंकडिंग चर्चेचा विषय ठरत आहे. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात लॉर्ड्सच्या (Lords) ऐतिहासिक मैदानावर तिसरा एकदिवसीय खेळण्यात आला. ज्यात भारताची फिरकीपटू दीप्ती शर्मानं (Deepti Sharma) इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला (Charlie Dean) मंकडिंग पद्धतीनं बाद केलं. दिप्ती शर्माची ती कृती नियमात बसणारी होती, तरी देखील खेळ भावनेचा मुद्दा उपस्थित करत इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी दिप्ती शर्मासह भारतीय संघावर टीका केली. तर, अनेकांनी दिप्ती शर्माचं समर्थन केलंय. याबाबत मंकडिंग विकेटची शिकार ठरलेली चार्ली डीननं आपली प्रतिक्रिया दिलीय. 


चार्लीनं तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलंय की, "उन्हाळाच्या एका अद्भुत पद्धतीनं शेवट झालाय. लॉर्ड्सवर इंग्लंडची जर्सी घालून खेळणं हा मोठा सन्मान आहे." दरम्यान, तिनं 'मंकडिंग' आऊटबाबतही तिनं टोमणा मारलाय."यापुढं मी क्रिझवरच राहिल", असंही तिनं आपल्या पोस्ट मध्ये म्हटलंय.


चार्ली डीनची इन्स्टाग्राम पोस्ट-






 


दीप्ती शर्माची प्रतिक्रिया
"चार्ली डीन हिला वारंवार सुचना देऊनही तिनं एकलं नाही. ती सतत क्रिझ सोडत होती, ज्यामुळं तिला ताकीद दिली होती. आम्ही पंचानाही सांगितलं होतं. पण तरीही तिचं क्रिझ सोडणं सुरुच होतं. आमच्याकडं दुसरा पर्याय नव्हता.आम्ही जे काही केलं, ते नियमांनुसार योग्य होतं."


आयसीसीचा नियमात बदल
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने म्हणजेच आयसीसीनं मंकडींगच्या नियमांमध्ये बदल केलाय. येत्या 1 ऑक्टोबरपासून हा नियम लागू केला जाणार आहे. नव्या नियमानुसार, गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधीच नॉन स्ट्राईकरचा फलंदाज क्रिजच्या बाहेर जात असेल तर, गोलंदाज त्याला रनआऊट करू शकतो. यापर्वी हा नियम अनाधिकृत म्हणून ठरवला जायचा. परंतु, आता फलंदाजाला रनआऊट म्हणून घोषित केलं जाईल. 


हे देखील वाचा-