Deepti Sharma on Charlie Dean Dismissal: भारत-विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची गोलंदाज दिप्ती शर्मानं (Deepti Sharma) इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला (Charlie Dean) अनोख्या पद्धतीनं धावबाद केल्यामुळें वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.दिप्ती शर्माची ती कृती नियमात बसणारी होती, तरी देखील खेळ भावनेचा मुद्दा उपस्थित करत इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी दिप्ती शर्मासह भारतीय संघावर टीका केली. तर, अनेकांनी दिप्ती शर्माचं समर्थन केलंय. या सर्व वादात आता प्रथमच दिप्ती शर्मानं प्रतिक्रिया दिलीय.
दीप्ती शर्मा म्हणाली की, "चार्ली डीन हिला वारंवार सुचना देऊनही तिनं एकलं नाही. ती सतत क्रिझ सोडत होती, ज्यामुळं तिला ताकीद दिली होती. आम्ही पंचानाही सांगितलं होतं. पण तरीही तिचं क्रिझ सोडणं सुरुच होतं. आमच्याकडं दुसरा पर्याय नव्हता.आम्ही जे काही केलं, ते नियमांनुसार योग्य होतं."
व्हिडिओ-
कर्णधाराचा दिप्ती शर्माला पाठिंबा
"दीप्तीनं केलेली कृती नियमाला धरूनच होती. आमच्याकडून काही गुन्हा झाला आहे, असं मला वाटत नाही. हा खेळाचा एक भाग आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) हा नियम आहे. त्यामुळं माझं दीप्तीला पूर्ण समर्थन आहे",असं भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीतनं म्हटलंय.
नेमकं काय घडलं?
भारत आणि इंग्लंड यांच्यात शनिवारी लॉर्ड्सच्या मैदानावर तिसरा आणि अखेरचा ODI सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारतानं दिलेल्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाची छमछाक झाली. इंग्लंड संघाकडून शार्लोट डीन ही एकटी किल्ला लढवत होती. तिनं 80 चेंडूंमध्ये 47 धावांचं योगदान दिलं. मात्र, 43व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडू टाकरण्यापूर्वी नॉन स्ट्राईकवर असलेल्या शार्लोट डीनने क्रीझ सोडलं. त्यावेळी दिप्ती शर्मानं क्रिकेटच्या नियमांचा पुरेपूर उपयोग करून शार्लोट डीनला धावबाद केलं.शार्लोट डीनच्या रुपात भारतानं इंग्लंडच्या संघाला 10 धक्का देत सामना जिंकला. मात्र, दिप्तीनं धावबाद करण्यासाठी वापरलेली पद्धत म्हणजे मंकडिंग असून हे खेळभावनेविरोधी कृती असल्याचं मत काहींनी व्यक्त केलंय. तर, काहींनी दिप्तीला थेट पाठिंबा दिलाय.
हे देखील वाचा-