Deepak Hooda Ruled Out: टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेशी (India vs South Africa) तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, येत्या 28 सप्टेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. भारताचा स्टार ऑलराऊंडर दीपक हुडा (Deepak Hooda) दुखापतीमुळं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत खेळणार नाही. हुडाशिवाय मोहम्मद शमीही या मालिकेत खेळेल, याची खात्री नाही. दरम्यान, श्रेयस अय्यर सध्या राखीव खेळाडू म्हणून संघासोबत असल्यानं त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

 

महत्वाची गोष्ट म्हणजे, ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात दिपक हुडा भारतीय संघाचा भाग होता. त्याच्या पाठिला दुखापत झाली असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत त्याला विश्रांती दिली जाणार असल्याची चर्चा होती. दीपक हुडाच्या रुपात भारताला मोठा धक्का बसलाय. दीपक हुडानं अलीकडच्या काळात टी-20 मध्ये चांगली कामगिरी केलीय. फलंदाजीसोबत तो संघासाठी गोलंदाजीही करू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. ज्यामुळं त्याला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला मुकावं लागलं होतं. मोहम्मद शामी अजूनही कोरोनाशी झुंज देतोय. यामुळं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत मोहम्मद शामीएवजी उमरान मलिकला भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता वाढलीय. 

 

ट्वीट-





 

 

श्रेयस अय्यरची संघात एन्ट्री होण्याची शक्यता

दरम्यान, हुडाच्या दुखापतीकडं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या वैद्यकीय पथकानं लक्ष देण्याची गरज असल्याचं कळतंय. त्यानं संघासोबत के तिरुअनंतपुरमचा दौराही केलेला नाही. आता या मालिकेसाठी राखाव खेळाडू म्हणून निवडलेला श्रेयस अय्यरला हुडाच्या जागी संघात स्थान मिळू शकतं.

 

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि श्रेयस अय्यर (संभाव्य).

 

हे देखील वाचा-