T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) सलामीला यावं, यावर सतत चर्चा सुरू आहे. आशिया चषक 2022 स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध विराट कोहलीनं सलामीला येऊन शतक झळकावलं होतं. त्यानंतर अशा चर्चांना उधाण आलं. याच दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय सलामीवीर केएल राहुलनं (KL Rahul) निराशाजनक कामगिरी केली. ज्यानंतर या चर्चेत आणखी भर पडली. सलामीवीर म्हणून विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या तुलनेत कोणाचं पारडं जड दिसतंय? हे खालील आकड्यांवरून स्पष्ट होईल.


सलामीवीर म्हणून विराट कोहलीची कमगिरी
विराट कोहलीनं आतापर्यंत 9 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी ओपनिंग केलंय. ज्यात 57.14 च्या सरासरीनं 400 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याचा स्ट्राईक रेट 161.29 इतका होता. या 9 डावात त्यानं एक शतक आणि दोन अर्धशतकं झळकावली आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 48 चौकार आणि 11 षटकार निघाले आहेत. 


सलामीवीर म्हणून केएल राहुलची कामगिरी
केएल राहुलनं आतापर्यंत 47 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी ओपनिंग केलंय. दरम्यान, 37 च्या सरासरीनं आणि 139 च्या स्ट्राईक रेटनं 1 हजार 590 धावा केल्या आहेत. म्हणजेच केएल राहुलनं विराट पेक्षा कमी सरासरीनं धावा केल्या आहेत, हे स्पष्ट होतंय. यादरम्यान, विराट कोहलीनं 16 अर्धशतकं ठोकली आहेत. ज्यात 128 चौकार आणि 64 षटकारांचा समावेश आहे. 


आशिया चषकात विराटची दमदार कामगिरी
जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देणाऱ्या विराट कोहलीनं आशिया चषक 2022 स्पर्धेत आपला फॉर्म गवसला. दरम्यान, आशिया चषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मोहम्मद रिझवाननंतर तो दुसऱ्या क्रमांकावर होता. या स्पर्धेत विराटच्या बॅटीतून त्याच्या टी-20 कारकिर्दीतील पहिलं शतकंही झळकलं. आफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं 53 चेंडूत शतक ठोकलं. हे त्याच्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीतील 71 वं शतक होतं. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात विराट कोहलीकडून अशाच कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. 


हे देखील वाचा-